बारामती ! तांदूळवाडीत ‘श्री गणेशा आरोग्याचा’ अभियानांतर्गत आरोग्य तपासणी शिबिर संपन्न 

बारामती (विनोद गोलांडे) : महाराष्ट्र शासनाचा उपक्रम मुख्यमंत्री सहायता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्ष तसेच सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ यांच्या समन्वयाने राबविण्यात येत असलेल्या ‘श्री गणेशा आरोग्याचा’ या आरोग्य अभियानांतर्गत ११८ सप्टेंबर रोजी तांदूळवाडी येथील शिवनगर गणेश मंडळाच्या वतीने सामुदायिक आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले.
या शिबिरामध्ये शासकीय महिला ग्रामीण रुग्णालय, बारामती येथील तज्ज्ञ डॉक्टरांनी परिसरातील नागरिकांची विविध आजारांसाठी तपासणी केली. यावेळी रोगनिदान, आवश्यक शस्त्रक्रियांसाठी मार्गदर्शन, रक्त तपासणी, ईसीजी तसेच इतर विविध वैद्यकीय तपासण्या मोफत करण्यात आल्या. तपासणीनंतर गरजेनुसार नागरिकांना औषधांचे वाटपही करण्यात आले.
या उपक्रमादरम्यान नागरिकांना आयुष्मान भारत कार्ड मोफत काढून देण्याची सुविधाही उपलब्ध करून देण्यात आली. त्यामुळे परिसरातील नागरिकांनी या उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. शिबिरात १५० हून अधिक नागरिकांनी सहभाग घेऊन आरोग्य तपासणी करून घेतली.
यावेळी वैद्यकीय अधीक्षक डॉ. बापू भोई, डॉ. मयूर बेलदार, डॉ अभिषेक घुले,पंढरी करणे, सौ जाई साळी, श राहुल नककावार, सौ.योगिता गडदरे, रियाज शेख, महेश खोपडे यांच्यासह शिवनगर कला क्रीडा प्रतिष्ठान गणेशोत्सव मंडळाचे सर्व कार्यकर्ते उपस्थित होते.
आरोग्य तपासणीसह विविध शासकीय आरोग्य सुविधांचा लाभ नागरिकांना एकाच ठिकाणी उपलब्ध करून दिल्याने या शिबिराचे परिसरातील नागरिकांकडून कौतुक करण्यात आले.

Comments

Popular posts from this blog

इंदापूर तालुक्यातील १६ हॉस्पिटलची नोंदणी संशयाच्या भोवऱ्यात; चौकशीचे आदेश.

गुन्हेगारी कारवायांना आळा घालण्यासाठी बारामती तालुक्यातील ४ इसमांना २ वर्षांसाठी हद्दपार.

तालुकास्तरीय कुस्ती व तायक्वांदो स्पर्धेत सोमेश्वर इंग्लिश मीडियम स्कूलचे यश.