CRIME NEWS निंबुत येथील ओढ्यालगत गावठी हातभट्टी दारूचा अड्डा उध्वस्त वडगाव निंबाळकर पोलिसांची कारवाई.....३ लाख ५९ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त.

CRIME NEWS निंबुत येथील ओढ्यालगत गावठी हातभट्टी दारूचा अड्डा उध्वस्त वडगाव निंबाळकर पोलिसांची कारवाई.


३ लाख ५९ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त.

सोमेश्वरनगर - बारामती तालुक्यातील वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशन हद्दीतील नींबूत गावच्या हद्दीत ओढ्यालगत मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे प्रमोद प्रकाश नवले राहणार लक्ष्मीनगर निंबुत तालुका बारामती जिल्हा पुणे हा गावठी हातभट्टी दारू तयार करीत असल्याची माहिती मिळाली. त्या माहितीच्या अनुषंगाने सहाय्यक पोलीस निरीक्षक नागनाथ पाटील व इतर स्टाफ सहित रवाना होऊन सदर ठिकाणी जाऊन पाहणी केली असता, ३ नग लोखंडी बॅरल मध्ये कच्चे रसायन, जमिनीत खड्ड्यामध्ये कच्चे रसायन, दोन नग प्लॅस्टिकच्या टाक्या, २४ नग ३५ लिटल क्षमतेचे हातभट्टी गावठी दारू, चार नग विद्युत मोटर पंप व इतर साहित्य असा एकूण 3 लाख 59 हजार किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. भारतीय न्याय संहिता व महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम प्रमाणे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
सदरची कारवाई संदीपसिंह गिल्ल, पोलीस अधीक्षक पुणे ग्रामीण, गणेश बिरादार, अप्पर पोलीस अधीक्षक, बारामती विभाग, सुदर्शन राठोड, उपविभागीय पोलीस अधिकारी, बारामती उपविभाग, अविनाश शिळीमकर, पोलीस निरीक्षक स्थानीक गुन्हे शाखा, पुणे ग्रामीण यांच्या मार्गदर्शनाखाली नागनाथ पाटील सहाय्यक पोलीस निरीक्षक, पोलीस हवालदार पोपट नाळे, अनिल खेडकर, महिला पोलीस हवालदार शुभांगी दणाने,पोलीस अंमलदार आबा जाधव,नरेंद्र यादव, धनंजय भोसले, विकास येटाळे,महिला पोलिस अंमलदार प्रियंका झणझणे, चालक पोलीस हवालदार विजय शेंडकर यांनी मिळून केली आहे.

Comments

Popular posts from this blog

वडगाव निंबाळकर पोलीस ठाण्याचे दीपक वारुळे यांची पोलीस उपनिरीक्षक (PSI ) पदी निवड

जिल्हा क्रीडा अधिकारी जगन्नाथ लकडे यांनी दिले ईकिगाई हे पुस्तक भेट.