सोमेश्वरनगर ! विद्या प्रतिष्ठान मध्ये प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा... 

सोमेश्वरनगर - बारामती तालुक्यातील विद्या प्रतिष्ठानचे सोमेश्वर इंग्लिश मीडियम स्कूल सी .बी .एस. ई. येथे प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले . 
             याप्रसंगी शाळेची माजी विद्यार्थिनी कु. सई सचिन भोसले हिच्या हस्ते राष्ट्रध्वज फडकवण्यात आला. सई मागील वर्षी सीबीएसई बोर्डातून 99.20 % गुण मिळवून बारामतीतून प्रथम आली होती. शाळेतील मुलांना प्रोत्साहन मिळावे यासाठी शाळा दरवर्षी अशा गुणवंत विद्यार्थ्यांच्या हस्ते ध्वज फडकवते . शाळेतील इयत्ता आठवी नववीतील विद्यार्थ्यांनी संचलनाद्वारे प्रमुख पाहुणे व ध्वजाला मानवंदना दिली . शाळेतील इयत्ता सहावीच्या विद्यार्थ्यांनी सुंदर लेझीम कवायत सादर केली . तसेच इयत्ता दुसरीतील विद्यार्थ्यांनी सांस्कृतिक कार्यक्रम सादर केला .
         यावेळी शाळेचे मुख्याध्यापक श्री.सचिन पाठक, सर्व शिक्षक व शिक्षकेतर  कर्मचारी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सारिका काकडे व शर्वरी महानवर यांनी केले.

Comments

Popular posts from this blog

श्रावण महिन्यानिमित श्री सोमेश्वर मंदिर हद्दीतील पार्किंग लिलाव उद्या रविवार रोजी होणार संपन्न.

वारकरी यांना औषधाचे किट मा. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे शुभहस्ते दिडी प्रमुखांना वाटप केले बाबत.

आईचे गर्भाशय हे मुलांच्या संस्काराचे विद्यापीठ - राष्ट्रीय समाजप्रबोधन कीर्तनकार ज्ञानेश्वर महाराज वाबळे