जिल्हा व तालुका क्रीडा संकुल बारामती पुणे मध्ये आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात संपन्न

जिल्हा व तालुका क्रीडा संकुल बारामती पुणे मध्ये आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात संपन्न

बारामती प्रतिनिधी

दिनांक २१ जून या आंतरराष्ट्रीय योगदिनाच्या निमित्त कोरोनाबाबतच्या शासकीय नियमाचे पालन करून योग शिबिराचे आयोजन  जिल्हा क्रीडा संकुल मधील लॉन टेनिस ग्राउंड वर करण्यात आले यावेळी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे खासगी सचिव हनुमंत पाटील,तहसीलदार विजय पाटील,बारामती बँकेचे व्हाईस चेअरमन अविनाश लगड, क्रेडाई चे अध्यक्ष दिपक काटे ,प्रो कबड्डी खेळाडू दादासो आव्हाड यांच्यासह विविध शाखेचे शासकीय पदाधिकारी तसेच बॅडमिंटन, कब्बडी, व्हॉलीबॉल,लॉन टेनिस, स्पोर्ट्स झुंबा,कराटे या खेळाचे प्रशिक्षक, खेळाडू व पदाधिकारी याच्या उपस्थिती मध्ये सोशल डिस्टंसिंग चे सर्व नियम पाळून उत्साहात पार पडला.
म.ए.सो हायस्कूलचे क्रीडा शिक्षक व योगाचार्य दादासाहेब शिंदे सर यांनी योगा प्रशिक्षण शिबीर घेतले आभार  तालुका क्रीडा अधिकारी  जगन्नाथ लकडे यांनी केले

Comments

Popular posts from this blog

श्रावण महिन्यानिमित श्री सोमेश्वर मंदिर हद्दीतील पार्किंग लिलाव उद्या रविवार रोजी होणार संपन्न.

वारकरी यांना औषधाचे किट मा. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे शुभहस्ते दिडी प्रमुखांना वाटप केले बाबत.

आईचे गर्भाशय हे मुलांच्या संस्काराचे विद्यापीठ - राष्ट्रीय समाजप्रबोधन कीर्तनकार ज्ञानेश्वर महाराज वाबळे