सोमेश्वर मधील "सती मालुबाई मंदिर" येथे संसदरत्न खासदार सुप्रियाताई सुळे यांचा ५२ वा वाढदिवस साजरा..

सोमेश्वर मधील "सती मालुबाई मंदिर" येथे संसदरत्न खासदार सुप्रियाताई सुळे यांचा ५२ वा वाढदिवस साजरा.. सोमेश्वरनगर प्रतिनिधी बारामती तालुक्यातील करंजे-माळवाडी येथील असणाऱ्या "सती मालुबाई मंदिर" ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस बारामती लोकसभा मतदार संघाच्या संसदरत्न लोकप्रिय खासदार सुप्रियाताई सुळे यांचा ५२ वा वाढदिवस बारामती पंचायत समिती सदस्या मेनका मगर, तालुकास्तरीय सार्वजनिक वितरण व्यवस्था व दक्षता समितीच्या सदस्या सुचिता साळवे यांच्या शुभ हस्ते वाढदिवस केक कापून साजरा करण्यात आला. वरिष्ठ मंडळाच्या सूचनेनुसार खासदार सुप्रिया ताईं सुळे यांचा वाढदिवस सर्व पदाधिकारी यांनी वृक्षारोपण करतच साजरा करावा असे आव्हाहन सोशल मीडियाच्या माध्यमातून केले होते त्या अनुषंगाने "सती मालुबाई" मंदिर परिसरात चिंच, वड, पिंपळ,करंज, चाफा अश्या ऑक्सिजन देणारी इतर ही झाडे चे वृक्षारोपणही मान्यवरांच्या हस्ते करत वाढदिवस साजरा केला. तसेच वाढदिवसाचे अवचित्य साधत नुकतीच आंतरराष्ट्रीय युवा शास्त्रज्ञ पुरस्कार मंगेश शेंडकर तसेच सार्वजनिक वितरण व्यवस्था व दक्षता समितीच्य...