"एकात्मिक विकास समन्वय व पुर्नविलोकन"समितीच्या अध्यक्षपदी संभाजी होळकर यांची निवड झाल्याबद्दल रामोशी समाजाच्या वतीने सत्कार.
"एकात्मिक विकास समन्वय व पुर्नविलोकन"समितीच्या अध्यक्षपदी संभाजी होळकर यांची निवड झाल्याबद्दल रामोशी समाजाच्या वतीने त्याचा सत्कार
सोमेश्वरनगर प्रतिनिधी
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे बारामती तालुका अध्यक्ष
संभाजी होळकर यांची एकात्मिक विकास समन्वय व पुर्नविलोकन समितीच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल रामोशी समाजाच्या वतीने त्याचा सत्कार करण्यात आला.
यावेळी रामोशी नाईक समाजाला विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी सविस्तर चर्चा करण्यात आली या मध्ये खासदार सुप्रिया ताई सुळे व आदरणीय अजित दादा पवार साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा परिषद,पंचायत समिती तसेच ग्रामपंचायत यांच्या माध्यमातून जी काही विकास कामे असतील किंवा प्रलंबित कामे असतील तसेच विविध योजना यांचे लाभ रामोशी नाईक समाजाला मिळवून दिले जातील असे आश्वासन संभाजी नाना होळकर यांनी दिले.
तसेच वडगाव निंबाळकर,वाकी, चोपडज या गावांमध्ये आद्यक्रांतीविर राजे उमाजी नाईक समाजमंदिर असतील किंवा सभा मंडप मंजूर करण्यात आली आहेत. त्याबद्दल समाजाच्या वतीने संभाजी होळकर यांचेआभार मानण्यात आले..
यावेळी जय मल्हार क्रांती संघटने पुणे जिल्हा अध्यक्ष पैलवान नानासाहेब मदने,जेष्ठ मार्गदर्शक बबन आण्णा भंडलकर,आप्पा भंडलकर,महेंद्र भंडलकर,आबासाहेब गायकवाड,ऋषी खोमणे,सोनु माकर,सोमनाथ जाधव,बापुराव भंडलकर,राहुल गाडेकर इत्यादी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
Comments
Post a Comment