तुळजाराम चतुरचंद महाविद्यालय व योद्धा प्रॉडक्शनमध्ये सामंजस्य करार संपन्न

तुळजाराम चतुरचंद महाविद्यालय व योद्धा प्रॉडक्शनमध्ये सामंजस्य करार संपन्न
बारामती : अनेकांत एज्युकेशन सोसायटीचे तुळजाराम चतुरचंद महाविद्यालय, बारामती आणि योद्धा प्रॉडक्शन, बारामती यांच्यात विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देणे, कला व सांस्कृतिक क्षेत्रातील कौशल्य विकासाला चालना देणे तसेच विद्यार्थ्यांना वेगळे व्यासपीठ व संधी उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने सामंजस्य करार (MoU) संपन्न झाला.

या सामंजस्य कराराच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना अभिनय, नाट्य, लघुपट व चित्रपट निर्मिती, नाट्यदिग्दर्शन, लेखन, नृत्य, संगीत तसेच विविध कला क्षेत्रांमध्ये प्रशिक्षण व मार्गदर्शन मिळणार आहे. तसेच कार्यशाळा, प्रशिक्षण शिबीरे, सांस्कृतिक उपक्रम, ऑडिशन व प्रत्यक्ष प्रकल्पांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना कला क्षेत्रातील अनुभव घेण्याची संधी उपलब्ध होणार आहे.

महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.अविनाश जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबविण्यात येत असून, महाविद्यालयाच्या सांस्कृतिक विभागाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या कलागुणांना योग्य दिशा देण्यासाठी विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे.

या सामंजस्य करारामुळे विद्यार्थ्यांना शिक्षणासोबतच कला व मनोरंजन क्षेत्रातील व्यावसायिक संधींची ओळख होऊन त्यांच्या सर्वांगीण व्यक्तिमत्त्व विकासास निश्चितच चालना मिळेल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.

या वेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.अविनाश जगताप, योद्धा प्रॉडक्शनचे संचालक श्री.योगेश नालंदे व श्री.नानासाहेब साळवे,उपप्राचार्य डॉ. योगिनी मुळे, डॉ. अरुण मगर, मराठी विभाग प्रमुख व कला शाखेच्या अधिष्ठाता प्रा.डॉ.सीमा नाईक-गोसावी व मराठी विभागातील सर्व सहकारी प्राध्यापक उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

इंदापूर तालुक्यातील १६ हॉस्पिटलची नोंदणी संशयाच्या भोवऱ्यात; चौकशीचे आदेश.

श्रावण महिन्यानिमित श्री सोमेश्वर मंदिर हद्दीतील पार्किंग लिलाव उद्या रविवार रोजी होणार संपन्न.