सोमेश्वरनगर ! नवरात्रोत्सव निमित्त चौधरवाडी येथील भवानी माता मंदिरात आज सप्तमी निमित्त विविध कर्यक्रम.
आरतीचा मान पवार व गोलांडे कुटूंबाला.
सोमेश्वरनगर वार्ताहर, बारामतीतील चौधरवाडी येथे असणारे। जागृती स्थान म्हणून घाटशिळा आई प्रसिद्ध तुळजा भवानी मंदिर डोंगरावर वसलेले आहे.दरवर्षी नवरात्र उत्सव मोठ्या उत्सा
हात दहा दिवस चौधरवाडी ग्रामस्थ करत असता
त. चौधरवाडी नजीक डोंगरावर भवानी माता मंदिर हे नवरात्रोत्त्सवानिमित्त केलेली विद्युत रोष
णाई केलेली आहे .डोंगरावर विविध झाडांचे वृक्षा
रोपण केल्याने देवीचा डोंगर हिरवागार दिसत आहे. मंदिर गाभाऱ्यात विविध फुलांनी आकर्षक सजावट केल्याने गाभा-याला फुल बागेचे स्वरूप प्राप्त झाले आहे . तसेच दररोज देवीला विविध रंगांच्या वस्त्रालंकार केली जाते त्यामुळे देवीचे विविध रूपे भाविकांना मनमोहुन घेतात . रविवार दि२ रोजी सातवीमाळ सप्तमी निमित्त सकाळच्या आरतीमान मंगेश यशवंत पवार सपत्नीक तसेच विनोद दिलीप गोलांडे सपत्नीक यांना देण्यात आला होता. स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव निमित्त चौधरवाडी गावातील ज्यांना75वर्ष पूर्ण झाल्याने आरती मान दिला ..या आरती प्रसंगी चौधरवाडी येथील मान्यवर ग्रामस्थ तसेच संबळ वादक व महिला वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता.
चौधरवाडी येथील भवानी माता मंदिर येथे नवरा
त्रोत्सवनिमित्त विविध जिल्ह्यातून भक्त भाविक आवर्जून दर्शनासाठी येत असतात देवीच्या डोंगर परिसरात यात्रेचे स्वरूप प्राप्त होते.
सप्तमीनिमित्त रविवार २ रोजी संध्याकाळी गीत गायन कार्यक्रम आहे अष्टमी ,नवमी ,महाप्रसादा
चेही आयोजन केलेले आहे , त्यामुळे चौधरवाडी सह सोमेश्वर पंचक्रोशीतील सर्वांनी या देवी दर्शन व महाप्रसादाचा लाभ घ्यावा असे नम्रविनंती चौधरवाडी ग्रामस्थांच्या वतीने केली आहे.
Comments
Post a Comment