Posts

Showing posts from February, 2026

CRIME NEWS निंबुत येथील ओढ्यालगत गावठी हातभट्टी दारूचा अड्डा उध्वस्त वडगाव निंबाळकर पोलिसांची कारवाई.....३ लाख ५९ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त.

Image
CRIME NEWS निंबुत येथील ओढ्यालगत गावठी हातभट्टी दारूचा अड्डा उध्वस्त वडगाव निंबाळकर पोलिसांची कारवाई. ३ लाख ५९ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त. सोमेश्वरनगर - बारामती तालुक्यातील वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशन हद्दीतील नींबूत गावच्या हद्दीत ओढ्यालगत मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे प्रमोद प्रकाश नवले राहणार लक्ष्मीनगर निंबुत तालुका बारामती जिल्हा पुणे हा गावठी हातभट्टी दारू तयार करीत असल्याची माहिती मिळाली. त्या माहितीच्या अनुषंगाने सहाय्यक पोलीस निरीक्षक नागनाथ पाटील व इतर स्टाफ सहित रवाना होऊन सदर ठिकाणी जाऊन पाहणी केली असता, ३ नग लोखंडी बॅरल मध्ये कच्चे रसायन, जमिनीत खड्ड्यामध्ये कच्चे रसायन, दोन नग प्लॅस्टिकच्या टाक्या, २४ नग ३५ लिटल क्षमतेचे हातभट्टी गावठी दारू, चार नग विद्युत मोटर पंप व इतर साहित्य असा एकूण 3 लाख 59 हजार किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. भारतीय न्याय संहिता व महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम प्रमाणे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. सदरची कारवाई संदीपसिंह गिल्ल, पोलीस अधीक्षक पुणे ग्रामीण, गणेश बिरादार, अप्पर पोलीस अधीक्षक, बारामती व...

महत्वाची बातमी...करंजे गावांमध्ये सोमवार दि. ०२ मार्च पासून आठवडे बाजार होणार सुरू....सर्व शेतकरी व्यापारी वर्ग व पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी याचा लाभ घ्यावा - सरपंच भाऊसो हुंबरे.

Image
महत्वाची बातमी...करंजे गावांमध्ये  सोमवार दि. ०२ मार्च  पासून  आठवडे बाजार होणार सुरू.... सर्व शेतकरी व्यापारी वर्ग व पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी याचा लाभ घ्यावा - सरपंच भाऊसो हुंबरे  सोमेश्वर/करंजे - बारामतीतील करंजे गाव या ठिकाणी आठवडे बाजार सुरू करण्यात येत आहे. जिल्हा परिषद गॅजेट नुसार सोमवारी बाजार भरवण्याकरिता परवानगी असून येणाऱ्या सोमवार दि. ०२ मार्च २०२६ रोजी बाजार सुरू करण्याचे नियोजन केले आहे. तरी सर्व व्यापारी वर्ग व आजुबाजुच्या परिसरातील सर्व ग्रामस्थांनी याचा लाभ घेवून ग्रामपंचायत करंजे-देऊळवाडी यांना सहकार्य करावे ही नम्रतेची विनंती. बाजाराची विशेष वैशिष्टये... ________________________ * पिण्याच्या पाण्यासाठी उत्तम सुविधा २४ तास पाणी उपलब्ध * व्यापाऱ्यांना बसण्यासाठी सुसज्ज बैठक व्यवस्था * पार्किंगची उत्तम सोय * चारही बाजूने बाजाराला जोडले जाणारे गावातील रस्ते  सरपंच, उपसरपंच, सर्व सदस्य ग्रामपंचायत करंजे-देऊळवाडी व सर्व ग्रामस्थ, करंजे-देऊळवाडी, ता. बारामती, जि.पुणे

वाणेवाडी येथे कराटे स्पर्धा उत्साहात संपन्न

Image
 वाणेवाडी येथे कराटे स्पर्धा उत्साहात संपन्न सोमेश्वरनगर : बारामती तालुक्यातील वाणेवाडी येथे कराटे स्पर्धा मोठ्या उत्साहात आणि शिस्तबद्ध वातावरणात पार पडल्या. विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास, शारीरिक तंदुरुस्ती आणि क्रीडाभावना वृद्धिंगत करण्याच्या उद्देशाने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेचे उद्घाटन न्यू इंग्लिश स्कूल, वाणेवाडीचे मुख्याध्यापक मा. मानसिंग जाधव सर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी संस्थेचे चीफ मास्टर धनंजय भोसले, सुनील भोसले, विक्रम भोसले, अशोक भोसले, विक्रम जगताप व अनिल यादव उपस्थित होते. संस्थेचे ग्रँडमास्टर प्रकाश रासकर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना कराटे हे केवळ स्वसंरक्षणाचे साधन नसून व्यक्तिमत्त्व विकासासाठी अत्यंत उपयुक्त असल्याचे सांगितले. तसेच शिस्त, आत्मविश्वास आणि मानसिक बळ वाढविण्यासाठी कराटेचे महत्त्व त्यांनी अधोरेखित केले. या स्पर्धेत सोमेश्वरसह बारामती परिसरातील मुला-मुलींनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. स्पर्धेपूर्वी विद्यार्थ्यांना ब्लॅक बेल्ट मास्टर तन्वी रणवरे यांनी मार्गदर्शन केले. स्पर्धेतील विजेते पुढीलप्रमाणे : यलो बेल्ट :शिवा...