Posts

Showing posts from August, 2024

Baramati शरद पवार साहेबांचे नातू योगेंद्र पवार यांनी ऊर्जा भवन येथे उपोषणाला पाठिंबा दर्शवला

Image
Baramati शरद पवार साहेबांचे नातू योगेंद्र पवार यांनी ऊर्जा भवन येथे उपोषणाला पाठिंबा दर्शवला बारामती - शरद पवार साहेबांचे नातू, मा. श्री. योगेंद्र (दादा) पवार यांनी ऊर्जा भवन येथे विविध विषयांवर सुरू असलेल्या उपोषणाला भेट देऊन पाठिंबा व्यक्त केला. या उपक्रमाच्या दरम्यान, त्यांनी शिवसेना पुणे जिल्हा कार्याध्यक्ष मा. श्री. पप्पू माने, बारामती लाईव्हचे मुख्य संपादक अमित बगाडे, शिवसेना वाहतूक विभागाचे पुणे जिल्हाध्यक्ष मा. श्री. बापू भिसे, ऍड. आकाश दामोदरे, आणि भाजप युवा मोर्चाचे महाराष्ट्र प्रदेश सदस्य मा. श्री. आकाश दामोदरे यांची उपस्थिती नोंदवली. या भेटीत योगेंद्र पवार यांनी उपोषणकर्त्यांशी संवाद साधला व त्यांच्या मागण्यांना आपला पाठिंबा दिला. या भेटीद्वारे त्यांनी उपोषणकर्त्यांचा मनोबल वाढवला आणि त्यांच्या समर्थनाने कार्यकर्त्यांमध्ये उत्साह निर्माण केला.

युवा नेते युगेंद्रदादा पवार यांचा बारामती पश्चिम भागाचा मतदार आभार दौरा संपन्न. ... विविध पदांवर नुकतेच भरती झालेल्या युवक युवतींचा सत्कार.

Image
युवा नेते युगेंद्रदादा पवार यांचा बारामती पश्चिम भागाचा मतदार आभार दौरा संपन्न.  विविध पदांवर नुकतेच भरती झालेल्या युवक युवतींचा सत्कार. सोमेश्वरनगर - बारामती तालुक्यातील सोमेश्वर परिसरात युवकांचे लोकप्रिय नेते युगेंद्रदादा पवार यांचा बारामती तालुक्यातील पश्चिम भागाचा आभार दौरा संपन्न झाला. यामध्ये  सदोबाचीवाडी, होळ (८ फाटा), सोरटेवाडी, करंजेपूल, वाणेवाडी, मुरूम, वाघळवाडी, निंबूत, गरदरवाडी, खंडोबाचीवाडी, करंजे, चौधरवाडी इत्यादी गावात जाऊन मतदारांचे आभार मानले. या दौऱ्यामध्ये तरुणांचा उत्सपूर्त प्रतिसाद मिळाला.आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांच्या सहकार्याने नवनवीन उद्योग आणण्याचे व तरुणांना जास्तीत जास्त रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्नशील राहणार असल्याचे बोलताना युगेंद्रदादा पवार यांनी करंजेपुल येथील सभेत सांगितले.  सोमेश्वर परिसरातील विविध पदांवर नुकतेच भरती झालेल्या युवक युवतींचा सत्कारही  हार शाल श्रीफळ  देत सत्कार करण्यात आला व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. या प्रसंगी ज्येष्ठ सतीशमामा खोमणे, सदाबाप्पू सातव, राजेंद्रबाप्पू जगताप, बाळासाहेब गायकवाड, प्रशा...

पिंपळी लिमटेक ग्रामपंचायतीच्या सरपंच पदी स्वाती अशोकराव ढवाण यांची बिनविरोध निवड

Image
बारामती:पिंपळी लिमटेक ग्रामपंचायतीच्या सरपंच पदी स्वाती अशोकराव ढवाण यांची बिनविरोध निवड करण्यात आली.   पिंपळी गावचे विद्यमान सरपंच मंगल हरिभाऊ केसकर यांनी पॅनेलच्या बैठकीत ठरविण्यात आलेला कार्यकाळ पूर्ण झाल्यानंतर सरपंच पदाचा राजीनामा दिला होता. त्या रिक्त झालेल्या जागेवरती पॅनेलच्या वतीने स्वाती अशोकराव ढवाण यांचा सरपंच पदाचा अर्ज भरण्यात आला होता. सदरची सरपंच पदाची जागा ही ओबीसी महिला करिता आरक्षित होती.  सरपंच पदाची निवडणूक ही सदस्यांमधून असल्याने ग्रामपंचायतीच्या दोन्ही गटाकडून अन्य कोणाचाही अर्ज न आल्याने सदरची निवडणूक बिनविरोध झाल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी तथा मंडलअधिकारी राजेंद्र गिरमे यांनी घोषित केले.          स्वाती ढवाण ह्या बारामती तालुका जिजाऊ सेवा संघ्याच्या विद्यमान अध्यक्षा आहेत. त्यांना सामाजिक कार्याची आवड असल्याने त्या जिजाऊ सेवा संघ व जिजाऊ बचतगटाच्या माध्यमातून गोरगरीब,गरजू महिला आणि नागरिकांसाठी तालुका व गावामध्ये सातत्याने विविध उपक्रम राबवित असतात. त्यांच्या निवडीने पिंपळी-लिमटेक गावामध्ये उत्साहाचे वातावरण निर्मा...

निरा नदी पात्रात ५ हजार ९८७ क्युसेक्स पाण्याचा विसर्ग सुरू.

Image
निरा नदी पात्रात ५ हजार ९८७ क्युसेक्स पाण्याचा विसर्ग सुरू.  वीर धरणातून आज सायंकाळी ५ वा.  निरा नदीत ५ हजार ९८७ क्युसेक्स पाण्याचा विसर्ग होणार आहे. पावसाचे प्रमाण व तीव्रता लक्षात घेता विसर्गामध्ये बदल करण्यात येईल. नागरिकांनी खबरदारी घ्यावी-कार्यकारी अभियंता, नीरा उजवा कालवा विभाग, फलटण, जिल्हा सातारा

सूर्यकांत पांडुरंग गायकवाड यांना सावित्रीबाई फूले पुणे विद्यापीठाची पीएचडी......

बारामती - सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या अर्थशास्त्र विभागातील संशोधक विद्यार्थी सूर्यकांत पांडुरंग गायकवाड यांना सावित्रीबाई फूले पुणे  विद्यापीठाने   "A Comparative Study of Socio- Economic Status of S.C., S.T. and Minority in Marathwada Region (2010-2020) (2010-2020 या कालखंडातील मराठवाडा विभागातील अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि अल्पसंख्यांक  यांच्या सामाजिक - आर्थिक स्थितीचा तुलनात्मक अभ्यास)या विषयावर विद्यापीठाला सादर केलेल्या प्रबंधाला Ph. D. पदवी प्रदान केली आहे. सूर्यकांत गायकवाड हे स्वतः मराठवाड्यातील असल्याने मराठवाड्यातील सामाजिक परिस्थिती चे त्यांना भान आहे.Ph. D. पदवी साठीची Viva यशस्वी पूर्ण केली. सूर्यकांत गायकवाड यांना त्यांच्या PhD साठी अर्थशास्त्र विभागातील मार्गदर्शक आणि मुगुटराव साहेबराव काकडे महाविद्यालय, सोमेश्वरनगर ता बारामती जि. पुणे येथे पूर्णवेळ अर्थशास्त्राचे प्राध्यापक म्हणून कार्यरत असणाऱ्या प्रा डॉ. गेणू (अजय ) दरेकर यांचे मार्गदर्शन मिळाले.