बारामती लोकसभा मतदार संघातून पुरंदरचे राजेंद्र बरकडे चर्चेत
बारामती लोकसभा मतदार संघातून पुरंदरचे राजेंद्र बरकडे चर्चेत सोमेश्वरनगर प्रतिनिधी एकीकडे बारामती लोकसभा मतदार संघात लोकसभेच्या निवडणुकीसाठी पवार घराण्याची प्रतिष्ठा पणाला लागली असताना काँगेसच्या महाराष्ट्र ओबीसी सेलकडून मात्र बारामतीच्या जागेसाठी पुरंदरच्या उमेदवाराची निवड करण्यात यावी यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरु असल्याचे चित्र स्पष्ट आहे. आगामी लोकसभेच्या निवडणुकीत खासदार पदासाठी बारामतीतून शरद पवार गटाकडून सुप्रिया सुळे तसेच राष्ट्रवादीतून सुनेत्रा पवार यांची नावे चर्चेत असली तरी देखील घराणेशाहीच्या संघर्षाला बगल देण्यासाठीच कॉंग्रेसच्या महाराष्ट्र ओबीसी सेलकडून कंबर कसली जात असल्याची चर्चा नागरिकांमध्ये आहे. यावेळी कॉंग्रेसच्या ओबीसी सेलचे प्रदेश अध्यक्ष भानुदास माळी यांनी बारामती लोकसभा मतदार संघातून पुरंदरचे राजेंद्र बरकडे यांना उमेदवारी मिळावी यासाठी कॉंग्रेस ओबीसीचे राष्ट्रीय अध्यक्ष अजयसिंग यादव यांच्याकडे शिफारस केली असून लोकसभेच्या ४८ जागांपैकी ९ जागा ओबीसीला मिळाव्यात अशी मागणी देखील केली आहे. त्यातच बारामती लोकसभा मतदार संघात धनगर समाजाचे प्राबल्य असून भाजपच्या ...