बारामती लोकसभा मतदार संघातून पुरंदरचे राजेंद्र बरकडे चर्चेत

बारामती लोकसभा मतदार संघातून पुरंदरचे राजेंद्र बरकडे चर्चेत
सोमेश्वरनगर प्रतिनिधी
एकीकडे बारामती लोकसभा मतदार संघात लोकसभेच्या निवडणुकीसाठी पवार घराण्याची प्रतिष्ठा पणाला लागली असताना काँगेसच्या महाराष्ट्र ओबीसी सेलकडून मात्र बारामतीच्या जागेसाठी पुरंदरच्या उमेदवाराची निवड करण्यात यावी यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरु असल्याचे चित्र स्पष्ट आहे.
आगामी लोकसभेच्या निवडणुकीत खासदार पदासाठी बारामतीतून शरद पवार गटाकडून सुप्रिया सुळे तसेच राष्ट्रवादीतून सुनेत्रा पवार यांची नावे चर्चेत असली तरी देखील घराणेशाहीच्या संघर्षाला बगल देण्यासाठीच कॉंग्रेसच्या महाराष्ट्र ओबीसी सेलकडून कंबर कसली जात असल्याची चर्चा नागरिकांमध्ये आहे.
यावेळी कॉंग्रेसच्या ओबीसी सेलचे प्रदेश अध्यक्ष भानुदास माळी यांनी बारामती लोकसभा मतदार संघातून पुरंदरचे राजेंद्र बरकडे यांना उमेदवारी मिळावी यासाठी कॉंग्रेस ओबीसीचे राष्ट्रीय अध्यक्ष अजयसिंग यादव यांच्याकडे शिफारस केली असून लोकसभेच्या ४८ जागांपैकी ९ जागा ओबीसीला मिळाव्यात अशी मागणी देखील केली आहे.
त्यातच बारामती लोकसभा मतदार संघात धनगर समाजाचे प्राबल्य असून भाजपच्या ओबीसी सेलकडूनही पणदरेच्या प्रियदर्शनी कोकरे यांना रिंगणात उतरविण्याच्या चर्चा रंगल्या आहेत.यापूर्वी सन २०१४ मध्ये महादेव जानकर यांनी धनगर समाजाच्या जीवावर तसेच राष्ट्रीय समाज पक्षाच्या चिन्हावर निवडूक लढवून सुप्रिया सुळे यांना कडवे आव्हान देत भाजपची वोट बँक राखली होती.
परंतु बारामती लोकसभा मतदार संघातून महाविकास आघाडीने कॉंग्रेसला जागा दिल्यास भाजपचा पत्ता निश्चितच कट होणार असल्याचा विश्वास कॉंग्रेस ओबीसी सेलचे पुणे जिल्हाध्यक्ष राजेंद्र बरकडे यांनी व्यक्त केला.

Comments

Popular posts from this blog

Baramati शरद पवार साहेबांचे नातू योगेंद्र पवार यांनी ऊर्जा भवन येथे उपोषणाला पाठिंबा दर्शवला

जिद्द, चिकाटी , सातत्य आणि ध्येय असले पाहिजे तर यश हे नक्कीच मिळते - पूजा चौगुले

सोमेश्वरनगर ! करंजे तंटामुक्त अध्यक्षपदी सचिन पाटोळे यांची निवड.