अभिमानास्पद ! 'पुणे जिल्हा शिक्षण मंडळा'च्या अजीव सदस्यपदी सुनील रघुनाथराव भोसले यांची निवड.
- Get link
- X
- Other Apps
अभिमानास्पद ! 'पुणे जिल्हा शिक्षण मंडळा'च्या अजीव सदस्यपदी सुनील रघुनाथराव भोसले यांची निवड.
सोमेश्वरनगर : बारामती तालुक्यातील वाणेवाडी येथील सुनील रघुनाथराव भोसले यांची पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या अजीव सदस्यपदी निवड करण्यात आली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या शुभ हस्ते बारामती येथे भोसले यांना नियुक्तीचे पत्र देण्यात आले.महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे अध्यक्ष आहेत. वाणेवाडी येथील सुनील भोसले हे बारामती तालुक्यातील विविध सामाजिक क्षेत्रात त्यांचा उस्फुर्त सहभाग असतो तसेच त्यांच्या कृष्णाई पतसंस्थेच्या माध्यमातून अनेक युवकांना तसेच परिसरातील व्यावसाईक त्यांची नेहमी मदत असते तसेच युवा पिढीलाही त्यांनी या माध्यमातून रोजगाराची संधी उपलब्ध केली आहे.तसेच सुनील भोसले यांचे वडील तसेच परिसरातील जेष्ठ नेते रघुनाथराव भोसले यांनीही या अगोदर पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे अजीव सदस्य म्हणून काम पाहिले आहे,आत्ता त्यांचा मुलगा सुनील भोसले यांना ही संधी मिळाल्याने परिसरातून त्यांच्यावर अभिनंदन व शुभेच्छांचा वर्षाव होत आहे
पुणे जिल्हा शिक्षण मंडळ ही मोठी संस्था असून याठिकाणी काम करण्याची संधी दिल्याबद्दल सुनील भोसले यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे आभार मानले आहेत. संस्थेचे नावलौकिक वाढवण्यासाठी प्रयत्न करणार असल्याची ग्वाही निवडीनंतर भोसले यांनी दिली.
- Get link
- X
- Other Apps
Comments
Post a Comment