Posts

Showing posts from July, 2023

विद्या प्रतिष्ठानचे सोमेश्वर इंग्लिश मिडीयम स्कूल व ज्युनिअर कॉलेज वाघळवाडी येथे विद्यार्थीप्रतिनिधींचा सोहळा पार पडला.विद्यार्थ्यांनी मतदानातून निवडला आपला विद्यार्थी प्रतिनिधी

Image
विद्या प्रतिष्ठानचे सोमेश्वर इंग्लिश मिडीयम स्कूल व ज्युनिअर कॉलेज वाघळवाडी येथे विद्यार्थी प्रतिनिधींचा सोहळा पार पडला. विद्यार्थ्यांनी मतदानातून निवडला आपला विद्यार्थी प्रतिनिधी सोमेश्वरनगर- बारामती तालुक्यातील विद्या प्रतिष्ठानचे सोमेश्वर इंग्लिश मिडीयम स्कूल व ज्युनिअर कॉलेज वाघळवाडी येथे विद्यार्थी प्रतिनिधींचा सोहळा पार पडला. लोकशाही पद्धतीचा वापर करून इयत्ता सहावी ते दहावीच्या विद्यार्थ्यांनी मतदार प्रत्येक मधून आपले विद्यार्थी प्रतिनिधी निवडले. दिनांक २२ जून रोजी निवडणुकीची घोषणा करण्यात आली. त्यानंतर इच्छुक प्रतिनिधींनी अर्ज दाखल दाखल करणे, समर्थन गोळा करणे, अर्ज माघारी घेणे प्रचार करणे, आपली भूमिका भाषणाद्वारे मांडणे. ही सर्व निवडणूक प्रक्रिया अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने पूर्ण केली. दिनांक ३० जून रोजी प्रत्यक्ष मतदान प्रक्रिया पार पडली. शाळेतील सामाजिक शास्त्र विभागाने अतिशय नियोजन पूर्ण प्रक्रिया पार पाडत सदर निवडणुकीचा निकाल जाहीर केला.   अधिक माहितीसाठी संपर्क-9762208437 यामध्ये नंदन कोरडे व तन्वी नवले तसेच सार्थक देशमुख व वेदांती भोसले सर्वाधिक मते मिळवून विद...

पुणे ! "डिजिटल मीडिया एक संघ" या संघटनेच्या पुणे जिल्हा अध्यक्षपदी अक्षय थोरात यांची निवड.

Image
"डिजिटल मीडिया एक संघ" या संघटनेच्या पुणे जिल्हा अध्यक्षपदी अक्षय थोरात यांची निवड. पुणे प्रतिनिधी ( शुक्रवार दि ७ जुलै) डिजिटल मीडिया एक संघ या संघटनेमध्ये पुणे जिल्हा अध्यक्षपदी  अक्षय थोरात यांची नुकतीच डिजिटल मीडिया एक संघ संस्थापक अध्यक्ष मधुकर बनसोडे यांनी सर्वानुमते  नियुक्ती करण्यात आली  ..तसेच अक्षय थोरात हे AV9 मराठी पुणे प्रतिनिधी असून अनेक घटकांना आपल्या बातमीच्या माध्यमातून त्यांनी सर्वसामान्य लोकांना न्याय देण्याचे काम केले असून तशी त्याची ओळख आहे ...तसेच ही निवड करत असताना  सर्व डिजिटल पत्रकार यांच्यावर होणाऱ्या अन्यायाला मोडून त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहण्याकरिता आपली नियुक्ती करण्यात येत आहे.असेही त्यांनी बोलताना सांगितले डिजिटल मीडिया एक संघ या संघटनेतील सर्व पदाधिकारी यांच्या एक मताशी आपल्याला पुणे जिल्हा अध्यक्षपदी नियुक्त करण्यात आलेले आहे   आपण आपल्या पदाचा कुठेही गैरवापर करणार नाही ही दक्षता बाळगावी अशीही सूचना या नियुक्तीपत्रात म्हटले आहे.. तसेच या निवडीबद्दल डिजिटल मीडिया एक संघाच्या वतीने त्यांना पुढील वाटचालीस शुभे...

विद्यार्थ्यांनी अनुभवला गुरु महतीचा प्रवास..!

Image
विद्यार्थ्यांनी अनुभवला गुरु महतीचा प्रवास..! सोमेश्वरनगर  -बारामती तालुक्यातील विद्या प्रतिष्ठानचे सोमेश्वर इंग्लिश मीडियम स्कूल व ज्युनिअर कॉलेज वाघळवाडी येथे गुरुपौर्णिमेचे औचित्य  ३ रोजी इयत्ता सहावी ते नववी तील विद्यार्थ्यांना सोमेश्वर परिसरातील सुप्रसिद्ध व्याख्याते संदीप जगताप यांनी मार्गदर्शन केले. सरांनी पौराणिक कथांचा दाखला देत आताच्या आधुनिक जीवन मूल्यांची उत्तम सांगड घालत आपल्या ओजस्वी भाषण कौशल्याने विद्यार्थ्यांना मंत्रमुग्ध केले.    इतिहासातील होऊन गेलेल्या श्रेष्ठ व्यक्तींच्या आयुष्यातील  मूल्य अंगीकारून आपण विद्यार्थी दशेतून एक उत्तम भारत देशाचा नागरिक कसे बनू शकतो याबद्दलही सरांनी अतिशय सोप्या भाषेत मार्गदर्शन केले.  कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शाळेतील शिक्षिका वर्षा मांढरे यांनी केले यावेळी शाळेतील प्राचार्य सचिन पाठक तसेच शिक्षक वर्ग उपस्थित होते.

सोमेश्वरनगर ! इंटरनॅशनल एक्सलन्स हेल्थ आरोग्य अवॉर्ड द्वारे "साई सेवा मल्टीस्पेशलिटी हॉस्पिटल अँड आय सी यु" यांना 'बेस्ट हॉस्पिटल रुरल एरिया' याने सन्मानित .

Image
सोमेश्वरनगर ! इंटरनॅशनल एक्सलन्स हेल्थ आरोग्य अवॉर्ड द्वारे "साई सेवा मल्टीस्पेशलिटी हॉस्पिटल अँड आय सी यु" यांना 'बेस्ट हॉस्पिटल रुरल एरिया' याने सन्मानित . सोमेश्वरनगर प्रतिनिधी - १ जुलै हा डॉक्टरांचा दिवस आहे. (डॉक्टर डे) म्हणून सर्वत्र साजरा करतात ...हा दिवस आमच्यासाठी सर्वात अविस्मरणीय आहे...त्याचे कारण आम्ही ग्रामीण भागातील आरोग्य सेवेत आणखी एक मानाचा तुरा स्थापित केला आहे. कळविण्यात आनंद होतो की साई सेवा मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल अँड आय सी यू साठी ग्रामीण भागातील सेवेकरिता मुंबई येथे आंतरराष्ट्रीय उत्कृष्ट आरोग्य पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. अशी माहिती  साई सेवा मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलचे डॉ विद्यानंद भिलारे यांनी दिली पुढे बोलताना म्हणाले की निश्चितपणे हा पुरस्कार आमच्या सर्व टीम च्या प्रामाणिक आणि उत्कट कार्याचा पुरस्कार आहे. सर्व रुग्ण आणि जवळपासच्या गावकऱ्यांबद्दल आम्ही खूप आभारी आहोत ज्यांनी ​​विश्वास ठेवला आणि दिवसेंदिवस सुधारण्यासाठी त्यांना सेवा देण्याची संधी दिली.  आंतरराष्ट्रीय पुरस्कार दिल्याबद्दल आणि आमच्या ग्रामीण भागातील  कार्य...