विद्यार्थ्यांनी अनुभवला गुरु महतीचा प्रवास..!

विद्यार्थ्यांनी अनुभवला गुरु महतीचा प्रवास..!
सोमेश्वरनगर -बारामती तालुक्यातील विद्या प्रतिष्ठानचे सोमेश्वर इंग्लिश मीडियम स्कूल व ज्युनिअर कॉलेज वाघळवाडी येथे गुरुपौर्णिमेचे औचित्य  ३ रोजी इयत्ता सहावी ते नववी तील विद्यार्थ्यांना सोमेश्वर परिसरातील सुप्रसिद्ध व्याख्याते संदीप जगताप यांनी मार्गदर्शन केले. सरांनी पौराणिक कथांचा दाखला देत आताच्या आधुनिक जीवन मूल्यांची उत्तम सांगड घालत आपल्या ओजस्वी भाषण कौशल्याने विद्यार्थ्यांना मंत्रमुग्ध केले.
   इतिहासातील होऊन गेलेल्या श्रेष्ठ व्यक्तींच्या आयुष्यातील  मूल्य अंगीकारून आपण विद्यार्थी दशेतून एक उत्तम भारत देशाचा नागरिक कसे बनू शकतो याबद्दलही सरांनी अतिशय सोप्या भाषेत मार्गदर्शन केले.
 कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शाळेतील शिक्षिका वर्षा मांढरे यांनी केले यावेळी शाळेतील प्राचार्य सचिन पाठक तसेच शिक्षक वर्ग उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

वडगाव निंबाळकर पोलीस ठाण्याचे दीपक वारुळे यांची पोलीस उपनिरीक्षक (PSI ) पदी निवड

प्रा. हनुमंत माने या वलयांकित व्यक्तिमत्वास बालगंधर्व परिवाराचा विशेष सन्मान पुरस्कार जाहीर...