विद्या प्रतिष्ठानचे सोमेश्वर इंग्लिश मिडीयम स्कूल व ज्युनिअर कॉलेज वाघळवाडी येथे विद्यार्थीप्रतिनिधींचा सोहळा पार पडला.विद्यार्थ्यांनी मतदानातून निवडला आपला विद्यार्थी प्रतिनिधी

विद्या प्रतिष्ठानचे सोमेश्वर इंग्लिश मिडीयम स्कूल व ज्युनिअर कॉलेज वाघळवाडी येथे विद्यार्थी
प्रतिनिधींचा सोहळा पार पडला.

विद्यार्थ्यांनी मतदानातून निवडला आपला विद्यार्थी प्रतिनिधी
सोमेश्वरनगर- बारामती तालुक्यातील विद्या प्रतिष्ठानचे सोमेश्वर इंग्लिश मिडीयम स्कूल व ज्युनिअर कॉलेज वाघळवाडी येथे विद्यार्थी
प्रतिनिधींचा सोहळा पार पडला. लोकशाही पद्धतीचा वापर करून इयत्ता सहावी ते दहावीच्या
विद्यार्थ्यांनी मतदार प्रत्येक मधून आपले विद्यार्थी प्रतिनिधी निवडले. दिनांक २२ जून रोजी निवडणुकीची घोषणा करण्यात आली. त्यानंतर इच्छुक प्रतिनिधींनी अर्ज दाखल दाखल करणे, समर्थन गोळा करणे, अर्ज माघारी घेणे प्रचार करणे, आपली भूमिका भाषणाद्वारे मांडणे. ही सर्व निवडणूक प्रक्रिया अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने पूर्ण केली. दिनांक ३० जून रोजी प्रत्यक्ष मतदान प्रक्रिया पार पडली. शाळेतील सामाजिक शास्त्र विभागाने
अतिशय नियोजन पूर्ण प्रक्रिया पार पाडत सदर निवडणुकीचा निकाल जाहीर केला.
  अधिक माहितीसाठी संपर्क-9762208437


यामध्ये नंदन कोरडे व तन्वी नवले तसेच सार्थक देशमुख व वेदांती भोसले सर्वाधिक मते
मिळवून विद्यार्थी प्रतिनिधी झाले. दिनांक ८ जुलै रोजी सर्व विद्यार्थी प्रतिनिधी व त्यांच्या कार्यकारी
मंडळाने अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने संचलन करत आपल्या वर्षभरांच्या कामाबद्दलची शपथ घेतली व
आपल्या कार्यभार स्वीकारला.
  यावेळी शाळेची शिक्षिका साधना शिंदे यांनी सूत्रसंचालन केले. यावेळी विद्यार्थी प्रतिनिधींचे
पालक तसेच पालक शिक्षक संघाचे कार्यकारी प्रतिनिधी उपस्थित होते. सदर कार्यक्रमाचे नियोजन
शाळेतील शिक्षक सचिन निंबाळकरव त्यांच्या सहकाऱ्यांनी पार पाडले

Comments

Popular posts from this blog

Baramati शरद पवार साहेबांचे नातू योगेंद्र पवार यांनी ऊर्जा भवन येथे उपोषणाला पाठिंबा दर्शवला

जिद्द, चिकाटी , सातत्य आणि ध्येय असले पाहिजे तर यश हे नक्कीच मिळते - पूजा चौगुले

सोमेश्वरनगर ! करंजे तंटामुक्त अध्यक्षपदी सचिन पाटोळे यांची निवड.