१७ मे आज जागतिक रक्तदाब दिनवयाच्या तिशीनंतर वर्षातून २ वेळा रक्तदाब तपासून घेणे- डॉ विद्यानंद भिलारे
१७ मे आज जागतिक रक्तदाब दिन वयाच्या तिशीनंतर वर्षातून २ वेळा रक्तदाब तपासून घेणे- डॉ विद्यानंद भिलारे बारामती प्रभात न्यूज (बुधवार दि १७) सोमेश्वरनगर वार्ताहर :- १७ मे हा दिवस जागतिक रक्तदाब दिन या दिनानिमित्त रक्तदाबविषयी माहिती संकलित बारामतीतील सोमेश्वर येथील साई सेवा मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल अॅण्ड आय.सी.यु.चे डॉ विद्यानंद मा भिलारे( MD CDM-UK ) बोलताना म्हणाले की...खरे तर रक्तदाबविषयी जास्त जनजागृती केली जात नाही तसेच त्याकडे इतक्या गंभीरतेने पहिले जात नाही पण रक्तदाब जास्त असणे किंवा कमी असणे यातून घातक व जीवघेणे उपद्रव होऊ शकतात , आपण पाहिले रक्तदाब म्हणजे काय ते समजून घेऊ रक्तदाब म्हणजे हृदयाने टाकलेले रक्तवाहिन्यावरील दबाव हा दोन पद्धतीने मोजला जातो सिस्टॉलीक व डायस्टलीक , सिस्टॉलीक रक्तदाब म्हणजे आपल्या भाषेत सांगायचे गेले तर वरचा रक्तदाब(हृदयाने रक्तवाहिणीवर टाकलेला जास्तीत जास्त दबाव) व डायस्टोलीक रक्तदाब म्हणजे खालचा रक्तदाब (हृदयाने रक्तवाहिणीवरुण दबाव काढून घेतल्यानंतर राहणारा न्यूनतम दबाव ) आता आपण याची योग्य पातळी किंवा नॉर्मल रेंज समजू...