अभिमानास्पद ! बारामतीतील माजी सैनिकाचा मुलगा राधेय महेश पाठक बनला "आर्मी एअर डिफेन्सचा लेफ्टनंट".

बारामती: बारामतीतील  माजी सैनिक महेश दिनकर पाठक  यांनी   सन  १९९०  ते  २००७ अशी १७ वर्ष भारतीय थलसेनेत हवालदार या पदावर सेवा करून निवृत्त   झाले  त्यांनी  सुद्धा  १७ वर्षात ३ वेळा जम्मू काश्मीर(उडी, राजोरी, लेह आणि सियाचीन ग्लेशियर येथे कर्तव्यास राहुन देश सेवा उत्तम पार पडली आहे त्यांच्या मुलागा राधेय याला सुध्दा आर्मी मध्ये चांगला ऑफिसर  बनवायचा अशी त्यांची ईच्या होती वडिलां च्या  ईच्या  पूर्ण  करायच्या म्हणून राधेय खुप मेहनत घेत त्याने   इयत्ता  १०  वी  पर्यंत बाल विकास मंदिर ICSE मध्ये शिकला त्यानंतर  त्याने  वालचंद कॉलेज सांगली येथून डिप्लोमा इन इलेक्ट्रिकल आणिकॉलेज ऑफ   इंजिनीरिंग    पुणे   COEP   येथून  B Tech इलेक्ट्रिकल पूर्ण केले विशेष म्हणजे त्याने सर्वपरीक्षा मध्ये  प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झालेला आहे, सन २०२० मध्ये  झालेल्या UPSC  च्या  CDSE   लेखी परीक्षेत पहिल्याच  प्रयत्नात   अखिल   भारतीय १२५  रँक ने उत्तीर्ण   झाला  आणि त्यानंतर  SSB बंगलोर येथील अत्यंत  काढीन अशा इंटरव्ह्यू  मध्ये त्याला पहिल्याच प्रयत्नात  यश  प्राप्त झाले, दिनांक २९ एप्रिल २०२३ रोजी  त्याचे  ऑफिसर  ट्रेनिंग अकादमी चेन्नई येथील प्रशिक्षण  यशस्वी  रित्या  पूर्ण झाल्यावर आर्मी एअर डिफेन्स मध्ये  त्याची लेफ्टनंट पदावर नियुक्ती झाली 
राधेयला शालेय जीवनापासून मैदानीखेळ थाळी फेक गोळा  फेक, भाला  फेक  आणि  सायकलिंग ची खूप आवड  असल्याने  त्याला  राज्य  स्तरीय  भाला फेक स्पर्धा जिंकल्या होत्या, या शिवाय तो पेडल पोयट्रि हा एक सांस्कृतिक कार्यक्रम सुद्धा चालवत असे कौटुंबि क सांगायचे  झाले तर राधेय ची आई एक उद्योजिका असून तिचा  लेडीज शॉपी चा व्यवसाय आहे,  वडील माजी  सैनिक  असून सध्या आर्थिक नियोजन सल्ला गार म्हणून कार्यरत आहेत,लहान बहीण १२ वी नंतर एल एल बी प्रवेशाची  तयारी करत आहे. सुसंस्कृत व सुशिक्षित   कुटुंबातून   राधेय  आर्मी एअर डिफेन्सचा लेफ्टनंट  पदावर  नियुक्ती  झाल्याने   बारामती  शहर परिसर  व  मित्र   परिवाराकडून   कुटुंबासह  राधेयचे कौतुक होत आहे.

Comments

Popular posts from this blog

Baramati शरद पवार साहेबांचे नातू योगेंद्र पवार यांनी ऊर्जा भवन येथे उपोषणाला पाठिंबा दर्शवला

जिद्द, चिकाटी , सातत्य आणि ध्येय असले पाहिजे तर यश हे नक्कीच मिळते - पूजा चौगुले

सोमेश्वरनगर ! करंजे तंटामुक्त अध्यक्षपदी सचिन पाटोळे यांची निवड.