१७ मे आज जागतिक रक्तदाब दिनवयाच्या तिशीनंतर वर्षातून २ वेळा रक्तदाब तपासून घेणे- डॉ विद्यानंद भिलारे

१७ मे आज जागतिक रक्तदाब दिन

वयाच्या तिशीनंतर वर्षातून २ वेळा रक्तदाब तपासून घेणे- डॉ विद्यानंद भिलारे 

बारामती प्रभात न्यूज (बुधवार दि १७)
सोमेश्वरनगर वार्ताहर :- १७ मे हा दिवस जागतिक रक्तदाब दिन या दिनानिमित्त  रक्तदाबविषयी माहिती संकलित बारामतीतील सोमेश्वर येथील साई सेवा मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल अॅण्ड आय.सी.यु.चे डॉ विद्यानंद मा भिलारे( MD CDM-UK ) बोलताना म्हणाले की...खरे तर रक्तदाबविषयी जास्त जनजागृती केली जात नाही तसेच त्याकडे इतक्या गंभीरतेने पहिले जात नाही पण रक्तदाब जास्त असणे किंवा कमी असणे यातून घातक व जीवघेणे उपद्रव होऊ शकतात , आपण पाहिले रक्तदाब म्हणजे काय ते समजून घेऊ 
रक्तदाब म्हणजे हृदयाने टाकलेले रक्तवाहिन्यावरील दबाव हा दोन पद्धतीने मोजला जातो सिस्टॉलीक व डायस्टलीक , सिस्टॉलीक रक्तदाब म्हणजे आपल्या भाषेत सांगायचे गेले तर वरचा रक्तदाब(हृदयाने रक्तवाहिणीवर टाकलेला जास्तीत जास्त दबाव) व डायस्टोलीक रक्तदाब म्हणजे खालचा रक्तदाब (हृदयाने रक्तवाहिणीवरुण दबाव काढून घेतल्यानंतर राहणारा न्यूनतम दबाव )
आता आपण याची योग्य पातळी किंवा नॉर्मल रेंज समजून घेऊ ,
वरचा रक्तदाब (सिस्टॉलीक) हा 90 mm of Hg ते 120 mm of Hg या मध्ये असेल तर  व खालील रक्तदाब 60 mm of Hg ते 80 mm of Hg च्या दरम्यान असेल तर नॉर्मल समाजाला जातो

१) उच्च रक्तदाब(Hypertension / High BP):-
120 mm of Hg च्या पुढे असणारा सिस्टॉलीक रक्तदाबस व 80 mm of Hg पेक्षा पुढे असणारा डायस्टोलीक रक्तदाबस उच्च रक्तदाब असे म्हणाले जाते.
(120 mm of Hg ते 135 mm of Hg साठी प्राथमिक किंवा स्टेज 1 रक्तदाब असे संबोधले जाते तसेच 136 mm of Hg ते पुढे 180 mm of Hg पर्यंत स्टेज 2 रक्तदाब आणि 180 mm of Hg च्या पुढे अति आत्यायिक रक्तदाब समजाला जातो )
2) अल्प रक्तदाब* (Hypotension / Low BP):-
90 mm of Hg च्या पेक्षा कमी असणारा सिस्टॉलीक रक्तदाबस व 60 mm of Hg पेक्षा कमी असणारा डायस्टोलीक रक्तदाबस अल्प रक्तदाब असे म्हणाले जाते 

वयाच्या ३० नंतर नियमित किमान वर्षातून २ वेळा आवर्जून आपण रक्तदाब तपासून घ्यावा किंवा जेव्हा जेव्हा आपण डॉक्टरांकडे जाता तेव्हा आपल्या रक्तदाबविषयी माहिती घेऊन चर्चा करावी

Comments

Popular posts from this blog

Baramati शरद पवार साहेबांचे नातू योगेंद्र पवार यांनी ऊर्जा भवन येथे उपोषणाला पाठिंबा दर्शवला

जिद्द, चिकाटी , सातत्य आणि ध्येय असले पाहिजे तर यश हे नक्कीच मिळते - पूजा चौगुले

सोमेश्वरनगर ! करंजे तंटामुक्त अध्यक्षपदी सचिन पाटोळे यांची निवड.