सोमेश्वरनगर ! नवरात्रोत्सव निमित्त चौधरवाडी येथील भवानी माता मंदिरात आज सप्तमी निमित्त विविध कर्यक्रम. आरतीचा मान पवार व गोलांडे कुटूंबाला. सोमेश्वरनगर वार्ताहर, बारामतीतील चौधरवाडी येथे असणारे। जागृती स्थान म्हणून घाटशिळा आई प्रसिद्ध तुळजा भवानी मंदिर डोंगरावर वसलेले आहे.दरवर्षी नवरात्र उत्सव मोठ्या उत्सा हात दहा दिवस चौधरवाडी ग्रामस्थ करत असता त. चौधरवाडी नजीक डोंगरावर भवानी माता मंदिर हे नवरात्रोत्त्सवानिमित्त केलेली विद्युत रोष णाई केलेली आहे .डोंगरावर विविध झाडांचे वृक्षा रोपण केल्याने देवीचा डोंगर हिरवागार दिसत आहे. मंदिर गाभाऱ्यात विविध फुलांनी आकर्षक सजावट केल्याने गाभा-याला फुल बागेचे स्वरूप प्राप्त झाले आहे . तसेच दररोज देवीला विविध रंगांच्या वस्त्रालंकार केली जाते त्यामुळे देवीचे विविध रूपे भाविकांना मनमोहुन घेतात . रविवार दि२ रोजी सातवीमाळ सप्तमी निमित्त सकाळच्या आरतीमान मंगेश यशवंत पवार सपत्नीक तसेच विनोद दिलीप गोलांडे सपत्नीक यांना देण्यात आला होता. स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव निमित्त चौधरवाडी गावातील ज्यांना75वर्ष पूर्ण झाल्याने
Posts
Showing posts from October, 2022
- Get link
- X
- Other Apps
मु. सा. काकडे महाविद्यालयाच्या वतीने ग्रामपंचायत वाघळवाडी येथे स्वच्छता अभियान संप न्न सोमेश्वरनगर:- बारामती तालुक्यातील मु.सा. काकडे महाविद्यालय राष्ट्रीय सेवा योजना व राष्ट्रीय छात्र सेना यांच्या संयुक्त विद्यमाने ' स्वच्छता ही सेवा '(SHS) या अभियानांतर्गत विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. या अभियानामध्ये सर्वप्रथम राष्ट्रीय सेवा योजनेचे उद्घाटन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. देवीदास वायदंडे यांच्या शुभहस्ते करण्यात आले. याप्रसंगी वाघळवाडी ग्रामपंचायत सरपंच प्रतिनिधी म्हणून तुषार सकुंडे उपस्थित होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे सहसचिव सतीश लकडे होते. राज्यशास्त्र विभाग प्रमुख डॉ.निलेश आढाव तसेच राष्ट्रीय सेवा योजना व राष्ट्रीय छात्र सेनेचे स्वयंसेवक आणि ग्रामस्थ बहुसंख्येने उपस्थित होते. या अभियानांतर्गत वाघळवाडी गावातील अंबामाता परिसर, ग्रामपंचायत कार्यालय परिसर, तसेच गावातील अंतर्गत रस्ते व कचरा कुंड्यांची स्वच्छता करण्यात आली. स्वच्छते विषयी गावातील लोकांमध्ये जनजागृती व्हावी म्हणून स्वच्छता दिंडीचे आयोजनही करण्यात आले होते. या
माहिती व जनसंपर्क महासंचालकपदी जयश्री भोज रुजू
- Get link
- X
- Other Apps
माहिती व जनसंपर्क महासंचालकपदी जयश्री भोज रुजू मुंबई :- शासनाचे काम जनतेपर्यंत आणि जनतेच्या भावना शासनापर्यंत पोहचवणारा दुवा म्हणून माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे काम महत्त्वपूर्ण ठरणारे आहे. शासन योजनांच्या अधिक व्यापक आणि गतिमान प्रसिद्धीचे काम संघटितपणे करण्याचे आवाहन नवनियुक्त माहिती व जनसंपर्क महासंचालक जयश्री भोज यांनी आज येथे केले. माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या महासंचालक पदाचा कार्यभार श्रीमती जयश्री भोज यांनी दीपक कपूर यांच्याकडून आज स्वीकारला. यावेळी श्रीमती भोज यांचे श्री. कपूर यांनी पुष्पगुच्छ देवून स्वागत केले. तसेच श्री.कपूर यांना पुष्पगुच्छ देवून निरोप देण्यात आला. यावेळी प्रभारी संचालक (वृत्त-जनसंपर्क) दयानंद कांबळे, उपसंचालक (प्रशासन) गोविंद अहंकारी, उपसंचालक (प्रदर्शने) श्रीमती सीमा रनाळकर, उपसंचालक (प्रकाशने) अनिल आलुरकर यांचेसह विभागातील वरिष्ठ अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते. पदभार स्वीकारल्यानंतर बोलताना श्रीमती भोज यांनी येत्या काळात सांघिक प्रयत्न आणि नाविन्यपूर्ण उपक्रमाच्या माध्यमातून शासन योजनांची व्यापक प्रसिद्धी