मु. सा. काकडे महाविद्यालयाच्या वतीने ग्रामपंचायत वाघळवाडी येथे स्वच्छता अभियान संपन्न
सोमेश्वरनगर:- बारामती तालुक्यातील मु.सा. काकडे महाविद्यालय राष्ट्रीय सेवा योजना व राष्ट्रीय छात्र सेना यांच्या संयुक्त विद्यमाने ' स्वच्छता ही सेवा '(SHS) या अभियानांतर्गत विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. या अभियानामध्ये सर्वप्रथम राष्ट्रीय सेवा योजनेचे उद्घाटन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. देवीदास वायदंडे यांच्या शुभहस्ते करण्यात आले.याप्रसंगी वाघळवाडी ग्रामपंचायत सरपंच प्रतिनिधी म्हणून तुषार सकुंडे उपस्थित होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे सहसचिव सतीश लकडे होते. राज्यशास्त्र विभाग प्रमुख डॉ.निलेश आढाव तसेच राष्ट्रीय सेवा योजना व राष्ट्रीय छात्र सेनेचे स्वयंसेवक आणि ग्रामस्थ बहुसंख्येने उपस्थित होते.या अभियानांतर्गत वाघळवाडी गावातील अंबामाता परिसर, ग्रामपंचायत कार्यालय परिसर, तसेच गावातील अंतर्गत रस्ते व कचरा कुंड्यांची स्वच्छता करण्यात आली. स्वच्छते विषयी गावातील लोकांमध्ये जनजागृती व्हावी म्हणून स्वच्छता दिंडीचे आयोजनही करण्यात आले होते. या सर्व कार्यक्रमांचे नियोजन राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी व विभागीय समन्वयक प्रा. अच्युत शिंदे, राष्ट्रीय छात्र सेनेचे प्रमुख लेफ्टनंट डॉ. श्रीकांत घाडगे यांनी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.देवीदास वायदंडे यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वीरित्या केले.
सर आपल्या मार्गदर्शनाखाली महाविद्यालयाची चांगली प्रगती होत आहे.
ReplyDeleteआपले अभिनंदन व पुढील कार्यासाठी शुभेच्छा