
बारामती ! "जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराजां"च्या पालखीचे बारामती तालुक्यात प्रशासनाच्यावतीने स्वागत 'हीच व्हावी माझी आस, जन्मोजन्मी तुझा दास, पंढरीचा वारकरी, वारी चुको न दे हरी ' बारामती प्रतिनिधी : भक्तिमय वातावरणात जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे आज बारामती तालुक्यात आगमन झाले. मौजे उंडवडी गवळ्याची ( गुंजखिळा ) येथे प्रशासनाच्यावतीने प्रांताधिकारी दादासाहेब कांबळे यांनी पालखी रथ आणि दिंड्यांचे स्वागत केले. दिंडी प्रमुख, विणेकरी यांचा शाल व श्रीफल देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी तहसिलदार विजय पाटील , गट विकास अधिकारी डॉ . अनिल बागल , विभागीय पोलीस अधिकारी गणेश इंगळे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. मनोज खोमणे , ॲग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टचे चेअरमन राजेंद्र पवार, पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक संभाजी होळक...