पुणे ! "मांगल्य परिवर्तन पॅनल" निवडणूक प्रचाराचा श्रीगणेशा..!महत्वाचे....निवडणूक मतदान रविवार,दिनांक ३ जुलै २०२२ रोजी सकाळी ९ ते दु.४.०० वाजता आहे.स्थळ - मांगल्य कार्यालय पुणे.
पुणे ! "मांगल्य परिवर्तन पॅनल" निवडणूक प्रचाराचा श्रीगणेशा..!
महत्वाचे....
निवडणूक मतदान रविवार,दिनांक ३ जुलै २०२२ रोजी सकाळी ९ ते दु.४.०० वाजता आहे.
स्थळ - मांगल्य कार्यालय पुणे.
पुणे - ज्येष्ठ कृ.१०,शके १९४४,गुरुवार,दि.२३ जून २०२२ रोजीच्या शुभमुहूर्तावर,पुण्याचे आराध्य दैवत श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ,पुण्याचे ग्रामदैवत श्री.कसबा गणपती व पुण्याची ग्रामसंरक्षक देवता श्री. तांबडी जोगेश्वरी यांच्या चरणी नतमस्तक होऊन, कुलवंत वाणी धर्मशाळा ट्रस्ट पुणे (मांगल्य) कार्यकारी मंडळ (विश्वस्त) निवडणूक (सन २०२२-२७) च्या निमित्ताने, "मांगल्य परिवर्तन पॅनेलच्या" निवडणूक प्रचाराचा शुभारंभ करण्यात आला.या शुभारंभाच्या निमित्ताने प्रस्तावना,उमेदवार अल्पपरिचय व वचननामा याची संयुक्त फोर कलर प्रिंटिंग पुस्तिका,मांगल्य परिवर्तन पॅनल उमेदवार फोर कलर मतपत्रिका,मांगल्य सभासद फोर कलर मतपत्रिका,मांगल्य परिवर्तन पॅनेल मफलर(मानाची रिबीन),बिल्ले(बॅच) इत्यादी निवडणूक प्रचाराचे साहित्य,आराध्यदैवत, ग्रामदैवत व ग्रामसंरक्षक देवता यांच्या चरणी अर्पण करून प्रत्यक्ष निवडणूक प्रचाराचा श्रीगणेशा करण्यात आला.
मांगल्य परिवर्तन पॅनेलचे अधिकृत उमेदवार श्री.जयंत प्रकाश सजगुरे,श्री.किरण रामचंद्र गुळुंबे,श्री.रविंद्र सुभाष गोलांडे,श्री.अमोल रामचंद्र सिद्ध,श्री.उमेश सुबोलचंद्र कोटकर,श्री.मुकुंद विश्वनाथ भसाळे व श्री.किशोर हरिभाऊ वासकर हे असून या सर्वांचे निवडणूक निशाण "विमान" हे आहे.सदर निवडणूक मतदान रविवार,दिनांक ३ जुलै २०२२ रोजी सकाळी ९ ते दु.४.०० यावेळेत मांगल्य कार्यालय पुणे याठिकाणी होत आहे.
मांगल्य परिवर्तन पॅनेलच्या वचननाम्याच्या माध्यमातून कुलवंत वाणी समजातील महिला भगिनी यांना मांगल्य सभासद करून घेणे,समाजबांधव करिता मोफत रुग्णवाहिकाची(ऍम्ब्युलन्स) सोय,मांगल्य वास्तू सुशोभीकरण,अल्पदरात पार्किंग व्यवस्था,मांगल्य सभासद,युवक-युवती,महिला भगिनी व ज्येष्ठ नागरिक करिता विविध उपक्रमाचे आयोजन करण्याचा मानस व संकल्प आहे.साक्षर,जागृत,परिपक्व, संवेदनशील व सकारात्मक विचार जोपासणारा मतदार राजा अर्थातच मांगल्य सभासद यांनी मांगल्य परिवर्तन पॅनलच्या सर्व उमेदवारांना भरघोस मताने विजयी करून वचननाम्याची पूर्तता करण्याची सुवर्णसंधी उपलब्ध करून द्यावी असा आशावाद श्री.जयंत सजगुरे यांनी माध्यमाच्या प्रतिनिधीशी बोलताना व्यक्त केला.
Comments
Post a Comment