Posts

Baramati प. पू. जगद्गुरु श्री श्री श्री १००८ डॉ. चंद्रशेखर शिवाचार्य महास्वामीजींचे बारामतीत होणार आगमन

Image
Baramati प. पू. जगद्गुरु श्री श्री श्री १००८ डॉ. चंद्रशेखर शिवाचार्य महास्वामीजींचे बारामतीत होणार आगमन बारामती : प. पू. जगद्‌गुरु श्री श्री श्री १००८ डॉ. चंद्रशेखर शिवाचार्य महास्वामीजी श्रीक्षेत्र काशी यांचे शुक्रवार दिनांक २२/११/२०२४ रोजी सायंकाळी ५ वाजता बारामती नगरीत आगमन होत आहे. शहरातील वीरशैव मंगल कार्यालय भिगवण रोड, बारामती. या ठिकाणी ते येणार आहेत. दीपावलीच्यापर्वात काशी महास्वामीजींचे दर्शन व आशीर्वचन म्हणजे खऱ्या अर्थाने बारामतीकरांची दिवाळी साजरी होणार आहे. या मंगलप्रसंगी सर्व समाज बंधू आणि भगिनींनी सदभक्तांनी उपस्थितीत राहून धर्मसभा, आशीर्वचन व दर्शन या पर्वणीचा लाभ अवश्य घ्यावा असे अहवान वीरशैव लिंगायत समाज बारामती यांनी केले आहे.

सोमेश्वरनगर ! करंजे तंटामुक्त अध्यक्षपदी सचिन पाटोळे यांची निवड.

Image
सोमेश्वरनगर ! करंजे तंटामुक्त अध्यक्षपदी सचिन पाटोळे यांची निवड. सोमेश्वरनगर - करंजे ग्रामपंचायत (ता बारामती )यांची मंगळवारी दि २४ रोजी करंजे ग्रामपंचायत कार्यालय येथे महात्मा गांधी तंटामुक्त गाव समिती अध्यक्ष निवडणूक मंगळवार दि २४ रोजी करंजे सरपंच भाऊसो हुंबरे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली यामध्ये तंटामुक्ती अध्यक्ष पदासाठी अँथनी मुलाणी, राकेश गायकवाड, सचिन पाटोळे उमेदवार होते. यामध्ये सचिन पाटोळे यांना १६७ व अँथनी मुलाणी यांना ११० आणि राकेश गायकवाड यांना ११० मते मिळाली . मतमोजणीनंतर सरपंच भाऊसो हुंबरे यांनी अधिकची मते मिळाल्याने सचिन पाटोळे हे तंटामुक्त गाव समिती अध्यक्षपदी निवडून आल्याचे जाहीर केले व ग्रामपंचायत कार्यालय येथे नवनिर्वाचित तंटामुक्ती अध्यक्ष सचिन पाटोळे यांचे हार पुष्पगुच्छ देत शुभेच्छा दिल्या. यावेळी करंजे ग्रामपंचायत ग्रामविकास अधिकारी चंद्रशेखर काळभोर, सर्व सदस्य , कर्मचारी वृंद मान्यवर ग्रामस्थ उपस्थित होते. अनुचित प्रकार घडू नये म्हणून वडगाव निंबाळकर ठाणे अंकित करंजेपुल दूरक्षेत्र पोलीस अधिकारी दीपक वारूळे व कॉन्स्टेबल परब यांचे विशेष सहकार्य लाभले.

Baramati शरद पवार साहेबांचे नातू योगेंद्र पवार यांनी ऊर्जा भवन येथे उपोषणाला पाठिंबा दर्शवला

Image
Baramati शरद पवार साहेबांचे नातू योगेंद्र पवार यांनी ऊर्जा भवन येथे उपोषणाला पाठिंबा दर्शवला बारामती - शरद पवार साहेबांचे नातू, मा. श्री. योगेंद्र (दादा) पवार यांनी ऊर्जा भवन येथे विविध विषयांवर सुरू असलेल्या उपोषणाला भेट देऊन पाठिंबा व्यक्त केला. या उपक्रमाच्या दरम्यान, त्यांनी शिवसेना पुणे जिल्हा कार्याध्यक्ष मा. श्री. पप्पू माने, बारामती लाईव्हचे मुख्य संपादक अमित बगाडे, शिवसेना वाहतूक विभागाचे पुणे जिल्हाध्यक्ष मा. श्री. बापू भिसे, ऍड. आकाश दामोदरे, आणि भाजप युवा मोर्चाचे महाराष्ट्र प्रदेश सदस्य मा. श्री. आकाश दामोदरे यांची उपस्थिती नोंदवली. या भेटीत योगेंद्र पवार यांनी उपोषणकर्त्यांशी संवाद साधला व त्यांच्या मागण्यांना आपला पाठिंबा दिला. या भेटीद्वारे त्यांनी उपोषणकर्त्यांचा मनोबल वाढवला आणि त्यांच्या समर्थनाने कार्यकर्त्यांमध्ये उत्साह निर्माण केला.

युवा नेते युगेंद्रदादा पवार यांचा बारामती पश्चिम भागाचा मतदार आभार दौरा संपन्न. ... विविध पदांवर नुकतेच भरती झालेल्या युवक युवतींचा सत्कार.

Image
युवा नेते युगेंद्रदादा पवार यांचा बारामती पश्चिम भागाचा मतदार आभार दौरा संपन्न.  विविध पदांवर नुकतेच भरती झालेल्या युवक युवतींचा सत्कार. सोमेश्वरनगर - बारामती तालुक्यातील सोमेश्वर परिसरात युवकांचे लोकप्रिय नेते युगेंद्रदादा पवार यांचा बारामती तालुक्यातील पश्चिम भागाचा आभार दौरा संपन्न झाला. यामध्ये  सदोबाचीवाडी, होळ (८ फाटा), सोरटेवाडी, करंजेपूल, वाणेवाडी, मुरूम, वाघळवाडी, निंबूत, गरदरवाडी, खंडोबाचीवाडी, करंजे, चौधरवाडी इत्यादी गावात जाऊन मतदारांचे आभार मानले. या दौऱ्यामध्ये तरुणांचा उत्सपूर्त प्रतिसाद मिळाला.आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांच्या सहकार्याने नवनवीन उद्योग आणण्याचे व तरुणांना जास्तीत जास्त रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्नशील राहणार असल्याचे बोलताना युगेंद्रदादा पवार यांनी करंजेपुल येथील सभेत सांगितले.  सोमेश्वर परिसरातील विविध पदांवर नुकतेच भरती झालेल्या युवक युवतींचा सत्कारही  हार शाल श्रीफळ  देत सत्कार करण्यात आला व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. या प्रसंगी ज्येष्ठ सतीशमामा खोमणे, सदाबाप्पू सातव, राजेंद्रबाप्पू जगताप, बाळासाहेब गायकवाड, प्रशांत बोरकर, प्रदीप शेंडकर,

पिंपळी लिमटेक ग्रामपंचायतीच्या सरपंच पदी स्वाती अशोकराव ढवाण यांची बिनविरोध निवड

Image
बारामती:पिंपळी लिमटेक ग्रामपंचायतीच्या सरपंच पदी स्वाती अशोकराव ढवाण यांची बिनविरोध निवड करण्यात आली.   पिंपळी गावचे विद्यमान सरपंच मंगल हरिभाऊ केसकर यांनी पॅनेलच्या बैठकीत ठरविण्यात आलेला कार्यकाळ पूर्ण झाल्यानंतर सरपंच पदाचा राजीनामा दिला होता. त्या रिक्त झालेल्या जागेवरती पॅनेलच्या वतीने स्वाती अशोकराव ढवाण यांचा सरपंच पदाचा अर्ज भरण्यात आला होता. सदरची सरपंच पदाची जागा ही ओबीसी महिला करिता आरक्षित होती.  सरपंच पदाची निवडणूक ही सदस्यांमधून असल्याने ग्रामपंचायतीच्या दोन्ही गटाकडून अन्य कोणाचाही अर्ज न आल्याने सदरची निवडणूक बिनविरोध झाल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी तथा मंडलअधिकारी राजेंद्र गिरमे यांनी घोषित केले.          स्वाती ढवाण ह्या बारामती तालुका जिजाऊ सेवा संघ्याच्या विद्यमान अध्यक्षा आहेत. त्यांना सामाजिक कार्याची आवड असल्याने त्या जिजाऊ सेवा संघ व जिजाऊ बचतगटाच्या माध्यमातून गोरगरीब,गरजू महिला आणि नागरिकांसाठी तालुका व गावामध्ये सातत्याने विविध उपक्रम राबवित असतात. त्यांच्या निवडीने पिंपळी-लिमटेक गावामध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून त्यांचेवर शुभेच्छांचा

निरा नदी पात्रात ५ हजार ९८७ क्युसेक्स पाण्याचा विसर्ग सुरू.

Image
निरा नदी पात्रात ५ हजार ९८७ क्युसेक्स पाण्याचा विसर्ग सुरू.  वीर धरणातून आज सायंकाळी ५ वा.  निरा नदीत ५ हजार ९८७ क्युसेक्स पाण्याचा विसर्ग होणार आहे. पावसाचे प्रमाण व तीव्रता लक्षात घेता विसर्गामध्ये बदल करण्यात येईल. नागरिकांनी खबरदारी घ्यावी-कार्यकारी अभियंता, नीरा उजवा कालवा विभाग, फलटण, जिल्हा सातारा

सूर्यकांत पांडुरंग गायकवाड यांना सावित्रीबाई फूले पुणे विद्यापीठाची पीएचडी......