महसूल पंधरवड्यानिमित्त आपत्ती व्यवस्थापनाबाबत जनजागृती


बारामती - महसूल पंधरवडानिमित्त तहसील कार्यालयाच्यावतीने बारामती बसस्थानक, उद्योग भवन, तसेच पेन्सिल चौक येथे आपत्ती व्यवस्थापनाबाबत आकर्षक एलईडी चित्ररथ, पथनाट्याद्वारे जनजागृती करण्यात आली. 

आपती व्यवस्थापनाअंतर्गत नागरिकांना भूकंप, चक्रीवादळ, उष्णतेची लाट, भूस्खलन, पूरपरिस्थिती, दुष्काळ, चेंगरा-चेगरी, आगीच्यावेळी करण्यात येणाऱ्या मदत व बचाव कार्याची माहिती देण्यात आली. आपत्तीच्या काळात नागरिकांनी बाळगावयाच्या सावधानतेबाबतही माहिती देण्यात आली. तसेच आपत्तीच्या काळात १०७०, १०७७ आणि ११२ या टोल फ्री क्रमांकावर आणि स्थानिक यंत्रणेशी संपर्क साधावा, असे नागरिकांना आवाहन करण्यात आले. 

यावेळी आपत्ती व्यवस्थापनाबाबत माहिती देणाऱ्या घडीपत्रिकेचे वितरण करण्यात आले. कार्यक्रमास तलाठी अमोल मारग, प्रदीप चोरमले, विनोद धापटे आदी उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

वडगाव निंबाळकर पोलीस ठाण्याचे दीपक वारुळे यांची पोलीस उपनिरीक्षक (PSI ) पदी निवड

प्रा. हनुमंत माने या वलयांकित व्यक्तिमत्वास बालगंधर्व परिवाराचा विशेष सन्मान पुरस्कार जाहीर...