जिद्द, चिकाटी , सातत्य आणि ध्येय असले पाहिजे तर यश हे नक्कीच मिळते - पूजा चौगुले
जिद्द, चिकाटी , सातत्य आणि ध्येय असले पाहिजे तर यश हे नक्कीच मिळते - पूजा चौगुले
सोमेश्वरनगर - नुकत्याच झालेल्या एमपीएससी परीक्षेमध्ये पोलीस उपनिरीक्षक (पीएसआय) पदी बारामतीतील वाणेवाडी येथील पूजा राहुल चौगुले /पूजा माणिक गायकवाड यांची निवड झाली. बातमी कळतात पूजा च्या कुटुंबातील सर्वच सदस्यांनी एकमेकांना पेढे भरवत आनंद व्यक्त केला. हे यश मिळवण्यासाठी सुरुवात २०१९ पासूनच पुजा ने अभ्यासाची सुरुवात केली , ध्येय पीएसआय व्हायचे असल्याने तीने तयारी तब्बल पाच वर्ष केली आणि यश संपादन केले कोणत्याही क्षेत्रातील यश संपादन करायचे असेल तर अभ्यास,जिद्द, चिकाटी , सातत्य आणि ध्येय असले पाहिजे तर यश हे नक्कीच मिळते असे बोलताना पूजाने सांगितले अभ्यासाचा प्रवास सोमेश्वरनगर येथील स्वामी विवेकानंद अभ्यासिकेचे गणेश सावंत यांनी मोलाचे मार्गदर्शन केले या यशाबद्दल आई-वडिलांची साथ लाभली , मोल मजुरी करून आर्थिक परिस्थिती बिकट असताना देखील आपली मुलगी शिकली पाहिजे मोठी अधिकारी झाली पाहिजे या अनुषंगाने तिला उच्च शिक्षण दिले ,लग्नानंतर वाणेवाडी येथील पती राहुल चौगुले यांनी देखील पत्नी पूजाला कुटुंबातील इतर कोणतेही जबाबदारी न देत अभ्यासात सातत्य ठेव तुला यश नक्कीच मिळेल अशी साथ दिली . तशी राहुलच्या घरची परिस्थिती ही जिमतेमच यामधूनही आपल्या पत्नी पूजा सोबत खंबीर पाठीशी राहिल्याने या मिळालेल्या यशामध्ये पती राहुल यांचे मोठे योगदान आहे असेही बोलताना पूजा म्हणाली.
पोलीस उपनिरीक्षक (पीएसआय ) यशाबद्दल सोमेश्वर पंचक्रोशीतून पुजाचे मान्यवरांच्या हस्ते सत्कार तसेच अभिनंदनासह कौतुकही होत आहे.
Comments
Post a Comment