सोमेश्वरनगर ! करंजेपुल चे सुपुत्र किरण आळंदीकर यांची इंडिया बुलिअन ॲन्ड ज्वेलर्स असोसिएशन पश्चिम महाराष्ट्राच्या अध्यक्षपदी निवड
सोमेश्वरनगर ! करंजेपुल चे सुपुत्र किरण आळंदीकर यांची इंडिया बुलिअन ॲन्ड ज्वेलर्स असोसिएशन पश्चिम महाराष्ट्राच्या अध्यक्षपदी निवड
सोमेश्वरनगर प्रतिनिधी - बारामती तालुक्यातील सोमेश्वरनगर,करंजेपुल येथील पूनम ज्वेलर्स, के. एम. आळंदीकर सराफ पेढीचे प्रमुख आणि बारामती सराफ असोसिएशनचे अध्यक्ष किरण आळंदीकर यांची पदोन्नती होऊन
इंडिया बुलिअन ॲन्ड ज्वेलर्स असोसिएशन (आयबीजेए) च्या पश्चिम महाराष्ट्राच्या
अध्यक्षपदी गुरुवारी (दि. ३) निवड झाली.
राष्ट्रीय अध्यक्ष पृथ्वीराज कोठारी, उपाध्यक्ष
चेतन मेहता, राष्ट्रीय सचिव सुरेंद्र मेहता, राज्याचे अध्यक्ष हरेश केवलरामानी, उत्तर भारताचे प्रमुख
अनुराग रस्तोगी, मध्य भारताचे प्रमुख अविश सराफ, मुख्य संचालक विजयकुमार लष्करे,
आसाम अध्यक्ष प्रदीप सरकार यांच्यासह पदाधिकाऱ्यांची बैठक नुकतीच मुंबईत पार पडली. यामध्ये किरण आळंदीकर यांच्या नावावर
शिक्कामोर्तब होऊन राज्याचे अध्यक्ष हरेश केवलरामानी यांनी त्यांना निवडीचे पत्र दिले.
किरण आळंदीकर यांनी यापूर्वी आयबीजेएमध्ये राज्य समन्वयक,संचालक या पदावर काम करीत
किरण आळंदीकर असताना संपूर्ण राज्यात संघटना
१०४ वर्षांपासून कार्यरत असून, भारत सरकार
आणि रिझर्व्ह बँकेकडून इब्जाने भारतातील जाहीर केलेले सोन्याचे दर अधिकृत म्हणून ग्राह्य धरले
जातात.बांधणी केली आहे. इब्जा ही राष्ट्रीय संघटना
लवकरच नवी मुंबई येथे सोने-चांदी व्यावसायिक आणि कारागिरांसाठी इब्जाच्या वतीने २३ एकर जागेत सुमारे ५० हजार कोटी रुपये गुंतवणूक असलेला भव्य प्रकल्प उभारण्यात येणार असून, या
प्रकल्पाचा भव्य भूमिपूजन समारंभ ज्येष्ठ नेते शरद पवार, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित
पवार, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत होणार असल्याची माहिती किरण आळंदीकर यांनी दिली. या निवडीबद्दल आळंदीकर
यांचे सराफ असोसिएशनसह विविध स्तरातून अभिनंदन होत आहे.
Comments
Post a Comment