बारामती तालुका ग्रामपंचायत कर्मचारी संघटनेच्या अध्यक्षपदी पिंटू सावंत तर सचिवपदी संजय दुबळे.
बारामती तालुका ग्रामपंचायत कर्मचारी संघटनेच्या अध्यक्षपदी पिंटू सावंत तर सचिवपदी संजय दुबळे.
मोरगाव प्रतिनिधी राहुल तावरे
बारामती तालुका ग्रामपंचायत कर्मचारी संघटनेच्या अध्यक्षपदी पिंटू दादाराम सावंत यांंची तर सचिवपदी संजय सदाशिव दुबळे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. दोन वर्ष कार्यकारी मंडळाची निवड प्रक्रिया सर्वानुमते सभेत अतिशय खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली. बिनविरोध पार पडलेल्या या निवड प्रक्रियेचा तालुक्यातील ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांनी आनंद व्यक्त केला.
बारामती पंचायत समितीच्या बांधकाम विभाग प्रणांगणात सन 2023 ते 2025 या दोन वर्षाच्या कालावधी करता तालुका कार्यकारणी निवड प्रक्रियेसाठी संघटनेचे सरचिटणीस कॉम्रेड ज्ञानोबा गुणे यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष मिटींगचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यकारणी निवड मंडळाच्या बैठकीसाठी तालुक्यातून अनेक ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांनी हजेरी लावली होती यावेळी सर्व कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत दोन वर्षाचे कार्यकारी मंडळ निवडण्यात आले.
*अध्यक्ष* -श्री पिंटू दादाराम सावंत
*सरचिटणीस*-श्री संजय सदाशिव दुबळे पाटील
*कार्यध्यक्ष* - श्री नवनाथ तात्याबा फाळके
*उपाध्यक्ष* - श्री मयूर गोपीचंद शेडगे
*सहचिटणीस* - सौ पल्लवी मिलिंद बागव
*कोषाध्यक्ष* -श्री शंकर हंबीरराव जगताप
*सहकोषाध्यक्ष*-श्री अमोल सदाशिव पारसे
*पदाधिकारी कार्यकारी मंडळ*
*सदस्य* श्री विशाल जराड
*सदस्य* श्री छगन लांडगे
*सदस्य* सौ कमल ताई जगताप
*सदस्य* - अमित दत्तात्रय भापकर
*सदस्य* - श्री रोहिदास बबन सोनवणे
*सदस्य*- श्री सोमनाथ उत्तम कुंभार
*सदस्य* - आकाश वायसे
*सल्लागार मंडळ सदस्य*
श्री मारूती रामचंद्र खोमणे
श्री गणेश शिवाजीराव मोरे
श्री बबन रामचंद्र साबळे,
या कार्यकारी मंडळात एकूण 17 पदाधिकाऱ्यांचा समावेश करण्यात आला आहे. यावेळी जिल्हा कार्याध्यक्ष कुंडलिक कुचेकर जिल्हा कार्यकारिणी ज्येष्ठ सल्लागार शहाबुद्दीन तांबोळी ज्येष्ठ सल्लागार मारुती खोमणे प्रसिद्धीप्रमुख राहुल तावरे आदी पदाधिकारी उपस्थित होते संघटनेचे अध्यक्ष अशोक दिनकरराव गायकवाड यांनी नवनिर्वाचित कार्यकारी मंडळाला यावेळी शुभेच्छा दिल्या.
Comments
Post a Comment