करंजे गावच्या वैभवात आणखीन एक भरभारतीय पत्रकार संघ तालुकाध्यक्ष पदी पत्रकार विनोद गोलांडे यांची निवड.
करंजे गावच्या वैभवात आणखीन एक भर
भारतीय पत्रकार संघ तालुकाध्यक्ष पदी पत्रकार विनोद गोलांडे यांची निवड.
बारामती- भारतीय पत्रकार संघ (AIJ) बारामती तालुका यांची मासिक बैठक मुर्टी ता, बारामती येथे रविवार दिनांक ४ रोजी पार पडली.भारतीय पत्रकार संघ हा दर महिन्यातील मासिक बैठकीमध्ये विविध सामाजिक उपक्रम राबवत असतो तसेच काशिनाथ पिंगळे यांच्या अध्यक्षतेखाली नविन कार्यकारणी सर्वानुमते जाहिर करण्यात आली असून पिंगळे यांनी अध्यक्ष पदाची धुरा विनोद गोलांडे यांच्या हाती सोपवली तर संघ
कार्यकारिणी मध्ये अध्यक्ष विनोद गोलांडे,उपाध्यक्ष : शंतनु साळवे ,सचिव सुशिलकुमार अडागळे,सह सचिव दत्तात्रय जाधव,कार्याध्यक्ष माधव झगडे
,संघटक महंमद शेख,हल्ला कृती समिती : निखिल नाटकर,कोषाध्यक्ष सोमनाथ जाधव,पदवीधर सल्लागार संभाजी काकडे,प्रसिद्धी प्रमुख अविनाश बनसोडे,कायदेशीर सल्लागार अॅड गणेश आळंदीकर,संघ प्रेस फोटोग्राफर : जितेंद्र काकडे या प्रसंगी पिंगळे यांनी सर्व नवनियुक्त पदाधिकारी व सदस्य तसेच माजी सर्व पदाधिकारी यांचे अभिनंदन व आभार मानले.
संघातील सर्व पत्रकार बांधवांना एकत्र घेत संघ वाढीसाठी तसेच संघामार्फत नवनविन व विविध उपक्रम राबवत,पत्रकार मित्रांना संरक्षण तसेच अडीअडचणीच्या वेळेस न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील राहिन तसेच भारतीय पत्रकार संघाचे स्थान जिल्ह्यात नंबर एक वर आणण्याचा प्रयत्न करेन.
नवनिर्वाचित भारतीय पत्रकार संघ बारामती
अध्यक्ष- विनोद गोलांडे
Comments
Post a Comment