नँशनल अँटी करप्शन अँन्ड क्राइम क्रँट्रोल ब्युरोच्या पोलीस प्रोटेक्शनच्या महाराष्ट्र राज्य अध्यक्षपदी डॉ.नानासाहेब भोळे
नँशनल अँटी करप्शन अँन्ड क्राइम क्रँट्रोल ब्युरोच्या पोलीस प्रोटेक्शनच्या महाराष्ट्र राज्य अध्यक्षपदी डॉ.नानासाहेब भोळे
■ बारामती 【 दि २८ फेब्रुवारी २०२३ 】 ■
डॉ भोळे हे केज तालुक्यातील मुलेगाव ग्रामपंचायत मध्ये २५ वर्ष म्हणून काम केले आहे तसेच बीड जिल्हा राष्ट्रवादी सरचिटणीस म्हणून आठ वर्षे तर विविध सामाजिक कार्यात नेहमीच अग्रेसर आणि निसर्ग उपचार वैद्यकीय क्षेत्रात त्यांचे उल्लेखनीय काम आहे. मागील अनेक वर्षांपासून बारामती सोमेश्वर भागात स्थायिक झालेल्या डॉ भोळे यांच्या कार्याची नोंद घेऊन नँशनल अँटी करप्शन अँन्ड क्राइम क्रँट्रोल ब्युरोचे राष्ट्रीय अध्यक्ष असलम शेख यांनी त्यांची महाराष्ट्र राज्य अध्यक्ष म्हणून निवड केली आहे. आता लवकरच महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यात जाऊन जिल्हा पदाधिकाऱ्यांच्या भेटी घेऊन , विविध प्रश्नांवर चर्चा करून ते सोडवण्यासाठी प्रयत्न करणार असून महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन विविध प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे डॉ.नानासाहेब भोळे यांनी बोलताना सांगितले.
Comments
Post a Comment