तब्बल ३० वर्षानंतर विश्वासराव रणसिंग महाविद्यालयाच्या माजी विद्यार्थ्यांनी साजरा केला भव्य स्नेह आनंद मेळावा

तब्बल ३० वर्षानंतर विश्वासराव रणसिंग महाविद्यालयाच्या माजी विद्यार्थ्यांनी साजरा केला भव्य स्नेह आनंद मेळावा कळंब - श्री वर्धमान विद्यालय, वालचंदनगर, वालचंद विद्यालय कळंब आणि विश्वासराव रणसिंग महाविद्यालय, कळंबच्या माजी विद्यार्थ्यांनी रविवार, दि. २९ जानेवारी २०२३ रोजी एक भव्य भेट समारंभ आयोजित केला होता. हा कार्यक्रम कृषी उत्पन्न बाजार समितीच्या बळीराजा सांस्कृतिक भवन, कळंब येथे संप्पन्न झाला. कार्यक्रमाला मोठा प्रतिसाद मिळाला. डॉ. आहेर सर (प्राचार्य, विश्वासराव रणसिंग कॉलेज, कळंब), डॉ. कुटे सर, प्रा. कदम सर, डॉ. बुवा सर (एचओडी, इंग्रजी विभाग, विश्वासराव रणसिंग कॉलेज कळंब), प्रा. अरुण निकम सर (उपप्राचार्य, श्री वर्धमान विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय, वालचंदनगर) प्रा. अरूण कांबळे (उपप्राचार्य - रणसिंग महाविद्यालय ) प्रा.सर्वगोड सर (प्राचार्य - वालचंद विद्यालय, कळंब) प्रा.जाधव सर, शेलार सर यांना या कार्यक्रमासाठी अतिथी म्हणून आमंत्रित करण्यात आले होते. सकाळी १० वाजता राष्ट्रगीताने कार्यक्रमाला सुरुवात झाली. त्यानंतर पाहुण्यांनी उपस्थितांना संबोधित केले. आपल्या भाषणात त्...