सोमेश्वरनगर ! श्री सोमेश्वर कारखान्याच्या उपाध्यक्षपदी प्रणिता मनोज खोमणे.

सोमेश्वरनगर ! श्री सोमेश्वर कारखान्याच्या उपाध्यक्षपदी प्रणिता मनोज खोमणे. सोमेश्वरनगर - श्री.सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या व्हाईस चेअरमन पदी सौ.प्रणिता मनोज खोमणे शुक्रवार दि ३० रोजी सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या रिक्त असलेल्या जागेवर व्हाईस चेअरमनपदी. प्रणिता मनोज खोमणे रा.कोऱ्हाळे खुर्द ता.बारामती जि.पुणे यांची बिनविरोध निवड झाली. निवडीच्या अगोदर अजित पवारसो विरोधी पक्षनेते (विधानसभा महाराष्ट्र राज्य) यांचे सूचनेनुसार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष संभाजी होळकर यांनी सौ.प्रणिता मनोज खोमणे यांच्या नावाची घोषणा केली. याप्रसंगी चेअरमन, पुरुषोत्तम जगताप, कार्यकारी संचालक राजेंद्र यादव व सर्व संचालक मंडळ उपस्थित होते.