मौर्य क्रांती महासंघाचे पहिले राज्यअधिवेशन व चौथी धनगर जागृती परिषद जेजुरी येथे संपन्न
जेजुरी (वार्ताहर ) महाराष्ट्राचे कुलदैवत तथा होळकर घराण्याचे आराध्य दैवत असलेल्या ऐतिहासिक जेजुरी नगरीत नुकतेच मौर्य क्रांती महासंघाचे पहिले राज्यअधिवेशन व चौथी धनगर जागृती परिषदमोठ्या उत्साहात संपन्न झाली परिषदेचे उदघाटक इंजिनिअर शिवाजीराव शेंडगे आणि संघटनेचे अध्यक्ष बलभीम माथेले यांनी आपल्या भाषणातून परिषदेला वैचारिक अधिष्ठान प्राप्त करून दिले सर्व जातींची जातीनिहाय जनगणना का ? व कशासाठी ? संख्येच्या प्रमाणात प्रतिनिधित्व दिल्यास सर्व जातींची प्रगती होणे शक्य आहे . त्यासाठी एकट्याने नव्हे तर एकीने लढावे लागेल असेमत यावेळी व्यक्त केले खंडोबा हि समस्त धनगर आणि बहुजन समाजाला जोडणारी विरासत आहे.येथुनच महात्मा फुले यांनी प्रेरणा घेतली व सत्य
शोधक समाजाची स्थापना केली समाजातील खर खोटे मुखवटे ,नेतृत्व यांच्यातील फरक समाज बांधवां
नी वेळीच ओळखून समाजाला दिशा देण्याचे काम मौर्य क्रांती महासंघाच्या माध्यमातून करावे असे मत कमलकांत काळे यांनी मांडले यावेळी कल्याणराव दळे ,मुबारक नदाफ, तुकाराम माळी, लक्ष्मण व्हटकर अंकुश निर्मळ , प्रविण काकडे , सुनिल भगत,पी.बी कोकरे , धनश्री आजगे ,जोतिबा पिसाळ ,आनंदा होन
माने,राहुल मदने आदिनी आपली मनोगते व्यक्त केली तत्पूर्वी जेजुरी गडावर असणा-या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या पुर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून ज्योत प्रज्वलित करून गजे ढोल ताशा व धनगरी ओव्या सुंबरान गात ज्योत अधि
वेशनाच्या ठिकाणी आणण्यात आली , हे अधिवेशन दोन सत्रामध्ये जेजुरी येथील सांस्कृतिक भवन येथे पार पडले या अधिवेशनासाठी मा. नगरसेवक संपत कोळेकर,भारतीय पत्रकार संघाचे पुणे जिल्हा अध्यक्ष रमेश लेंडे ,पिसुर्डी गावाचे मा सरपंच अशोक बरकडे यशवंत पडळकर, संतोष खोमणे, उत्तम लेंडे , मयुरेश लेंडे , राम पिसाळ, गुरु गोविंद सोन्नर, शैला नवघरे सुर्यकांत पुजारी, शिवाजी वैद्य, सुरेश शिंदे , चंदकांत बंडगर , सुभाष शेंगुळे , हनुमंत दवंडे, निलेश बनकर कालिदास चोरमले, अनिल हाके, प्रकाश माने, रविंद्र बंडगर , सचिन धायगुडे आदि उपस्थित होते परभणी धुळे,सांगली,सातारा,वाशीम,खानदेश,सोलापूर,कोकण ,प. महाराष्ट्र, बुलढाणा, नाशिक, मुंबई आदि ठिका
णाहून धनगर व बहुजन समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते, कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजीव हाके प्रस्ताविक उत्तम कोळेकर तर आभार संतोष गावडे यांनी मानले.
Comments
Post a Comment