Baramati भारतीय पत्रकार संघाची बैठक संपन्न.
बारामती
बारामती तालुक्यातील मेडद येथे रविवारी दि २० रोजी भारतीय पत्रकार संघ बारामती ची बैठक संपन्न झाली ,या दरम्यान पत्रकारांनी विविध विषयांवर चर्चा करण्यात आली व जेष्ठ पत्रकारांनी ... त्या प्रश्नाचे योग्य निरसनही केले,बारामती तालुक्यातील बहुसंख्येने पत्रकार बांधव उपस्थित होते. पत्रकारिता करतांना पत्रकारांना वेगवेगळ्या आव्हानांना सामोरे जावे लागते. काही वेळेस पत्रकारांना खोट्या गुन्ह्यात अडकवण्याचा प्रयत्न केला जातो. याबाबत बैठकीदरम्यान चर्चा करण्यात आली. उपस्थित पत्रकारांना संघाचे पुणे जिल्हा उपाध्यक्ष तैनूर शेख यांनी मार्गदर्शन केले. यावेळी संघाच्या पुढील कार्यक्रमांचे नियोजन करण्यात आले तसेच नवीन आलेल्या पत्रकारांचा परिचय करून देण्यात आला. यावेळी संघाचे पुणे जिल्हा उपाध्यक्ष तैनूर शेख, बारामती तालुकाध्यक्ष काशिनाथ पिंगळे, उपाध्यक्ष विनोद गोलांडे, कार्याध्यक्ष विकास कोकरे, प्रसिध्दी प्रमुख सुशीलकुमार अडागळे, पत्रकार हल्लाकृती समिती प्रमुख निखिल नाटकर, सदस्य पत्रकार शांतनू साळवे, अजय पिसाळ, माधव झगडे, दत्तात्रय जाधव, नवनाथ बोरकर, शरद भगत हे उपस्थित होते. बैठकीचे आयोजन पत्रकार माधव झगडे यांनी केले होते.
Comments
Post a Comment