मु.सा. काकडे महाविद्यालयांमध्ये हिंदी दिवस व हिंदी पंधरावडा उत्साहात संपन्न

मु.सा. काकडे महाविद्यालयांमध्ये हिंदी दिवस व हिंदी पंधरावडा उत्साहात संपन्न
 
सोमेश्वरनगर(मेघा गोलांडे): बारामती तालुक्याती
 मु.सा. काकडे  महाविद्यालय  सोमेश्वरनगर मध्ये हिंदी विभाग द्वारा आयोजित हिंदी दिवस व हिंदी पंधरावडा  उत्साहात  संपन्न  झाला.  या उपक्रमा अंतर्गत काव्यवाचन स्पर्धा, ऑडिओ युजवल  शो आणि मुधोजी महाविद्यालय फलटण येथील हिंदी विभाग  प्रमुख डॉ.नितीन धवडे यांचे हिंदी विषया
मधील  उपलब्ध  संधी  या  विषयावर   मार्गदर्शन आयोजित  करण्यात  आले होते . भाषेचे संवर्धन आणि  आधुनिक  युगातील हिंदीचे महत्त्व आपण सर्वांनी जपले पाहिजे अशा प्रकारचे विचार त्यांनी यावेळी मांडले.तसेच महाविद्यालयाच्या कार्यक्रमा
च्या  अध्यक्षस्थानी  महाविद्यालयाचे उपक्रमशील प्राचार्य डॉ.देविदास वायदंडे हे होते.यावेळीत्यांनी  भाषा  ही  मूळ  जन्मजात  आपली संस्कृती आहे आणि   संस्कृतीची  जपणूक  केली   की   आपण भाषेचे  जतन करू शकतो हे यावेळी त्यांनी सांगि
तले. कार्यक्रमाचे  प्रास्ताविक हिंदी विभाग प्रमुख प्रा. अच्युत शिंदे  यांनी  केले यावेळी  त्यांनी हिंदी विभागांतर्गत  होणाऱ्या  विविध उपक्रमांची, कार्य
क्रमांची माहिती दिली कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन प्रा.  पोपट जाधव व कार्यक्रमाचे  सूत्रसंचालन डॉ कल्याणी जगताप  यांनी केले.याप्रसंगी  महाविद्या
लयाचे उपप्राचार्य डॉ. जगन्नाथ साळवे, उपप्राचार्य डॉ.जया कदम,उपप्राचार्य डॉ.प्रवीण ताटे  देशमुख आय क्यू एसी  समन्वयक  डॉ. संजू जाधव तसेच प्रा. डॉ.  बाळासाहेब  मरगजे, डॉ.  राहुल   खरात डॉ.श्रीकांत घाडगे,डॉ.दत्तात्रय डुबल प्रा.आदिनाथ लोंढे   डॉ. नारायण  राजूरवार   महाविद्यालयाच्या विविध   विभागाचे   प्रमुख  , सर्व  प्राध्यापक बंधू भगिनी   आणि   विद्यार्थी   विद्यार्थिनी  शिक्षकेतर कर्मचारी बहुसंख्येने उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

सोमेश्वरनगर ! करंजे तंटामुक्त अध्यक्षपदी सचिन पाटोळे यांची निवड.

Baramati प. पू. जगद्गुरु श्री श्री श्री १००८ डॉ. चंद्रशेखर शिवाचार्य महास्वामीजींचे बारामतीत होणार आगमन