Posts

Showing posts from September, 2022

मु.सा. काकडे महाविद्यालयांमध्ये हिंदी दिवस व हिंदी पंधरावडा उत्साहात संपन्न

मु.सा. काकडे महाविद्यालयांमध्ये हिंदी दिवस व हिंदी पंधरावडा उत्साहात संपन्न   सोमेश्वरनगर(मेघा गोलांडे): बारामती तालुक्याती  मु.सा. काकडे  महाविद्यालय  सोमेश्वरनगर मध्ये हिंदी विभाग द्वारा आयोजित हिंदी दिवस व हिंदी पंधरावडा  उत्साहात  संपन्न  झाला.  या उपक्रमा अंतर्गत काव्यवाचन स्पर्धा, ऑडिओ युजवल  शो आणि मुधोजी महाविद्यालय फलटण येथील हिंदी विभाग  प्रमुख डॉ.नितीन धवडे यांचे हिंदी विषया मधील  उपलब्ध  संधी  या  विषयावर   मार्गदर्शन आयोजित  करण्यात  आले होते . भाषेचे संवर्धन आणि  आधुनिक  युगातील हिंदीचे महत्त्व आपण सर्वांनी जपले पाहिजे अशा प्रकारचे विचार त्यांनी यावेळी मांडले.तसेच महाविद्यालयाच्या कार्यक्रमा च्या  अध्यक्षस्थानी  महाविद्यालयाचे उपक्रमशील प्राचार्य डॉ.देविदास वायदंडे हे होते.यावेळीत्यांनी  भाषा  ही  मूळ  जन्मजात  आपली संस्कृती आहे आणि   संस्कृतीची  जपणूक  केली   की   आपण भाषेचे  जतन करू शकतो हे याव...
Image
बारामती ! सर्व विभागांनी सेवा पंधरवडा यशस्वी करावा-प्रांताधिकारी दादासाहेब कांबळे बारामती - बारामती तालुक्यात १७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर या कालावधीत ‘राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता सेवा पंधरवडा’ राबविण्यात येत असून सर्व विभागणी सेवा पंधरवडा यशस्वी करावा, असे आवाहन प्रांताधिकारी दादासाहेब कांबळे यांनी केले.  बारामती  तहसील कार्यालय, पंचायत समिती, नगरपरिषद व कृषि विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने आदिराज मंगल कार्यालय  येथे लाभार्थ्यांना विविध सेवांच्या वितरणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी प्रांताधिकारी दादासाहेब कांबळे बोलत होते.  यावेळी  तहसिलदार  विजय पाटील, गट विकास अधिकारी डॉ. अनिल बागल,  तालुका कृषि अधिकारी सुप्रिया बांदल, निवासी नायब तहसिलदार विलास करे, नायब तहसिलदार डॉ. भक्ती सरवदे- देवकाते विविध विभागाचे अधिकारी, कर्मचारी, लाभार्थी आदी उपस्थित होते.  यावेळी प्रांताधिकारी श्री. कांबळे म्हणाले, आज  जिल्ह्यात सर्व ठिकाणी  महासेवा दिन साजरा करण्यात येत आहे.  सेवा पंधरवड्यात एकूण १४ सेवांचा लाभ देण्यात येत आहे. सर्व विभागांनी...
Image
सोमेश्वरनगर ! वृक्षारोपण करत संचालक  ऋषिकेश गायकवाड यांचा वाढदिवस उत्साहात साजरा.   सोमेश्वरनगर - बारामतीतील श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याचे विद्यमान संचालक ऋषिकेश गायकवाड यांचा वाढदिवस आजी माजी सैनिक संघटना कार्यालय आवारात बुधवार दि. 21 रोजी वृक्षारोपण करून उत्साहात साजरा करण्यात आला.    यावेळी आजी माजी  सैनिक संघ अध्यक्ष  बाळासाहेब शेंडकर, सचिव पंकज कारंडे, कार्याध्यक्ष नितीन शेंडकर,गणेश शेंडकर, अँड गणेश आळंदीकर ,रविंद्र कोरडे,सामाजिक कार्यकर्ते शिवाजी शेंडकर, हरबल लाईफ क्लबचे ओकर जगताप, विवेकानंद अभ्यासिका अध्यक्ष गणेश सावंत,करंजेपुल माजी उपसरपंच  निलेश गायकवाड,युवा नेते उद्योजक सागर गायकवाड, सोमेश्वर स्पोर्ट अकॅडमी सदस्य हरीश गायकवाड, सुरज जाधव आदी मान्यवर उपस्थित होते.
Image
राज्य वन्यजीव मंडळाच्या बैठकीत 18 नवीन संवर्धन राखीव क्षेत्र घोषीत वन्यजीवांच्या संवर्धनासोबतच ग्रामस्थांच्या दैनंदिन जीवनावर परिणाम होणार नाही याची दक्षता घ्यावी- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे   मुंबई : राज्यात १८ नवीन आणि ७ प्रस्तावित संवर्धन राखीव क्षेत्र घोषीत करण्यास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज मान्यता दिली. त्यामुळे महाराष्ट्रात संवर्धन राखीव क्षेत्रांची संख्या ५२ होणार आहे. त्यामाध्यमातून राज्यात सुमारे १३ हजार चौरस किलोमीटर क्षेत्र संरक्षित  होण्यास मदत होणार आहे. अशा संवर्धन राखीव क्षेत्रातील वन्यजीवांचे संवर्धन करताना त्या भागातील ग्रामस्थांच्या दैनंदिन जीवनात अडचण येणार नाही, त्यांचे हक्क बाधीत होणार नाही याची दक्षता घेण्याचे निर्देश मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी यावेळी दिले.             मंत्रालयात मुख्यमंत्री श्री. शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली राज्य वन्यजीव मंडळाची १९ वी बैठक झाली. यावेळी वनमंत्री सुधीर मुनगंटीवार, वन विभागाचे प्रधान सचिव वेणुगोपाल रेड्डी, प्रधान मुख्य वनसंरक्षक डॉ. वाय. एल. पी. राव, वन्यजीव मंडळाचे सदस्य सचिव तथा प्रधान...