शिकाऊ विमान कडबनवाडी(ता इंदापूर) गावचे हद्दीत कोसळले

शिकाऊ विमान कडबनवाडी(ता इंदापूर) गावचे हद्दीत कोसळले
बारामती - आज दिनांक 25.07.2022 रोजी 11:20 ते 11:25 वाजेदरम्यान कारवार एव्हिएशन बारामती यांचे शिकाऊ विमान कडबनवाडी, ता. इंदापूर, जि. पुणे गावचे हद्दीत कोसळले असून यामध्ये एक शिकाऊ महिला उमेदवार भाविका राठोड वय २२ वर्ष रा. पुणे किरकोळ जखमी झाल्याची प्राथमिक माहिती आहे.

 कारवार एव्हिएशन बारामती यांचे शिकाऊ विमान हे इंधन संपल्यामुळे कडबनवाडी गावचे हद्दीत कोसळले. कु. भविका  राठोड या किरकोळ जखमी झाले असून त्यांना औषधउपचारासाठी नवजीवन हॉस्पिटल, शेळगाव या ठिकाणी पाठविण्यात आले आहे. इतर कोणत्याही प्रकारची हानी नाही, घटना ठिकाणी कारवार एव्हिएशन बारामती यांचे स्टाफ हजर असून योग्य बंदोबस्त घटनास्थळी ठेवला असल्याची प्राथमिक माहिती प्रशासनातर्फे प्राप्त झाली आहे.

Comments

Popular posts from this blog

सोमेश्वरनगर ! करंजे तंटामुक्त अध्यक्षपदी सचिन पाटोळे यांची निवड.

Baramati प. पू. जगद्गुरु श्री श्री श्री १००८ डॉ. चंद्रशेखर शिवाचार्य महास्वामीजींचे बारामतीत होणार आगमन