
रोटरी क्लब ऑफ बारामती अध्यक्षपदी डॉ. अजय दरेकर यांची निवड. सोमेश्वरनगर - रोटरी क्लब ऑफ बारामती अध्यक्षपदी डॉ. अजय दरेकर यांची तर सचिवपदी अरविंद गरगटे यांची एकमताने निवड करण्यात आली. नुकत्याच झालेल्या पदग्रहण समारंभात प्रांतपाल अनिल परमार व पोलिस उपअधिक्षक गणेश इंगळे यांच्या हस्ते दरेकर, गरगटे यांना अधिकार सुपूर्द करण्यात आले. रोटरी क्लब ऑफ बारामतीच्या वतीने नुकताच बारामती येथे पदग्रहण समारंभ संपन्न झाला. अध्यक्षस्थानी अनिल परमार होते. याप्रसंगी सहायक प्रांतपाल निखिल मुथा, पल्लवी साबळे, अजय चौधरी, राजेस राऊत, पंकज पटेल, नितीन ढमाले, माधव तिळगुळकर, संतोष मराठे, चारूचंद श्रोत्री, संतोष गिरंगे, राजेंद्र भवाळकर, रूपेश कांबळे, सुभाष चांदगुडे, डॉ. अमोल खाानवरे उपस्थित होते. यानिमित्ताने बारामती तालुका मुख्याध्यापक संघ, भारत ज्ञान विज्ञान समुदाय, निंबुत ग्रामविकास प्रतिष्ठान यांचे पदाधिकारीही उपस्थित होते. गणेश इंगळे यांनी, रोटरी क्लबने शाळांच्या विकासात महत्वपूर्ण योगदान दिले आहे अशी प्रशस्ती करतानाच यापुढील काळात जे विकासापासून वंचित व मागास राहिलेत त्यांच्यासा...