करंजेत विश्वरत्न महामानव बोधिसत्व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची १३१ वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी.
बारामतीतील करंजेगाव मध्ये अठरापगड जाती असले तरी सर्वच महापुरुषांचे जयंती उत्सव एकत्रित साजरे होत असते.
सोमेश्वरनगर - बारामती तालुक्यातील करंजे येथे विश्वरत्न महामानव बोधिसत्व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची १३१ वी जयंती करंजे ग्रामस्थांसह सोमेश्वर पंचक्रोशीतील सर्व नागरिकांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. कोरणा च्या पार्श्वभूमीवर गेले दोन वर्ष जयंती साजरी न करता आली त्याअनुषंगाने यावर्षी मोठ्या उत्साहात साजरी करता आली याचे समाधान व्यक्त करत आज शुक्रवार दि १४ एप्रिल रोजी जयंतीनिमित्त भीमा कोरेगाव येथून ज्योतीचे आगमन करंजेपुल येथे सकाळी नऊ वाजता सोमेश्वर सहकारी कारखान्याचे विद्यमान संचालक म प्रवीण कांबळे,ऋषिकेश गायकवाड, रमाकांत गायकवाड, बाळासाहेब गायकवाड, शिवाजी गायकवाड, सरपंच वैभव गायकवाड, करंजे माजी उपसरपंच बुवासाहेब हुंंबरे ,निहाल गायकवाड, आम आदमी पक्षाचे मुरलीनाना गायकवाड, शिवसेनेचे बंटी गायकवाड,माजी तंटामुक्ती अध्यक्ष संताजी गायकवाड, पत्रकार संतोष शेंडकर,विनोद गोलांडे, बारामती तालुका राष्ट्रवादी उपाध्यक्ष प्रतापराव गायकवाड,सामाजिक कार्यकर्ते किरण शेंडकर, शिवाजी शेंडकर, आजी माजी सैनिक संघटना अध्यक्ष बाळासाहेब शेंडकर,सचिन पाटोळे, विकास भंडलकर, यांच्या उपस्थितीत स्वागत करण्यात आले. तसेच सोमेश्वर कारखाना समोरील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास सुर्यकांत गायकवाड व फुलाजी हुंबरे यांच्या शुभहस्ते पुष्पहार घालण्यात आला.
त्याचबरोबर मोठ्या जयघोषात जयंती मिरवणूक करंजेपुल मुख्य चौकामध्ये येत ग्रामपंचायत करंजे येथे आगम होत कार्यालयातील सर्व महापुरुषांच्या फोटोंना पुष्पहार घालण्यात आले. यावेळी सरपंच जया गायकवाड, उपसरपंच बाळासाहेब शिंदे, ग्रामसेवक, सदस्य तसेच बहुसंख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.
समाज मंदिरामध्ये डाव साळवे यांच्या मार्गदर्शनाखाली बौद्ध पुजा घेण्यात आली. यावेळी भिमरत्न बौद्ध युवक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष दाजीराम साळवे यांनी अतिशय मोलाचे मार्गदर्शन केले. पोलीस पाटील राजेश सोनवणे यांनी सुत्रसंचलन केले. अजित जगताप व राजेश गायकवाड यांच्या सहकार्याने सर्व उपस्थितांना महाप्रसादाचे अतिशय निवेदन बद्दल आयोजन केले होते त्याचा सर्व उपस्थितांनी लाभ घेतला.
सायंकाळी सहा वाजता जगाला शांततेचे संदेश देणारे तथागत गौतम बुद्ध यांच्या पुतळ्याचे व विश्वरत्न महामानव बोधिसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा फुले यांच्या प्रतिमेची नियोजनबद्ध फटाक्यांच्या आवाजात ,विद्युत रोशनाईमध्ये, सर्व ग्रामस्थांच्या उपस्थित भव्य अशी मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीमध्ये महिला व मुले बहुसंख्येने उपस्थित होती. यावेळी भीम गीतांचा गजर चालू होता. घोषणांनी आसमंत दणाणून सोडले होते. सर्वांच्या मनामध्ये अतिशय उत्साहात ठासून भरला होता. वडगाव निंबाळकर चे सहाय्यक पोलीस निरीक्षक सोमनाथ लांडे यांच्या मार्गदर्शनाखाली करंजेपुल दूरक्षेत्राचे पोलीस निरीक्षक योगेश शेलार सह पोलीस कर्मचारी कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
भिमरत्न बौद्ध युवक संस्थेचे अध्यक्ष विरसेन हुंबरे, उपाध्यक्ष बापु साळवे, खजिनदार दत्तात्रय गायकवाड, भाऊसाहेब हुंबरे, दौलतराव साळवे, किशोर हुंबरे यांच्या मार्गदर्शनाखाली हा सोहळा पार पडला.
Comments
Post a Comment