Posts

Showing posts from April, 2022
Image
जिल्हास्तरीय शिकाऊ उमेदवार भरती मेळावा २१ एप्रिल रोजी पुणे दि.१७-प्रशिक्षण महानिदेशालय नवी दिल्ली यांच्या निर्देशानुसार देशपातळीवरील शिकाऊ उमेदवारांकरिता जिल्हस्तरीय शिकाऊ उमेदवार भरती मेळाव्याचे आयोजन २१ एप्रिल २०२२ रोजी सकाळी १० वाजता  औंध येथील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या कौशल्य सभागृहात करण्यात आले आहे. शिकाऊ उमेदवारी भरती योजना ही कुशल कारागीर घडविणारी योजना आहे. औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील अभ्यासक्रम पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांसाठी ही एक चांगली संधी आहे. आयटीआय उत्तीर्ण उमेदवारांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन सहकायक प्रशिक्षणार्थी सल्लागार विलास टेके आणि  अंशकालीन प्राचार्य बी.आर.शिंपले यांनी केले आहे.
Image
भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक समता कार्यक्रम महिला मेळावा आणि तृतीयपंथी व्यक्तींना  ओळखपत्राचे वाटप पुणे - भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक समता कार्यक्रमांतर्गत सहायक आयुक्त समाज कल्याण कार्यालयाद्वारे सामाजिक न्याय भवन येथे महिला मेळावा व तृतीयपंथी  व्यक्तींसाठी जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाला समाज कल्याण आयुक्तालयातील शिक्षण उपसंचालक निशादेवी बंडबर,  समाज कल्याण उपायुक्त रविंद्र कदम पाटील, साधना रणखंबे,  सहायक आयुक्त संगिता डावखर, नीता होले,  तृतीयपंथी तक्रार निवारण सोनाली दळवी, बिंदू माधव खिरे, भूमी फाऊंडेशनचे कैलास पवार, पुणेरी प्राईडचे प्रसाद गोंडकर, मित्र क्लिनीकचे अनिल उकरंडे, कै.अंकुशराव लांडगे शैक्षणिक सामाजिक ट्रस्टचे डॉ.विजय मोरे आदी उपस्थित होते. महिला मेळाव्यात श्रीमती होले यांनी ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या जीवनकार्याविषयी माहिती दिली. श्रीमती रणखंबे आणि बंडगर यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा जीवनपट आपल्या भाषणातून मांडला.  *तृतीयपंथीयांसाठी जनजागृती मेळावा* तृतीयपंथीयांसाठी आयोजित ...
Image
पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर राष्ट्रीय पुरस्कार २०२१ अंकिता पाटील ठाकरे यांना प्रदान इंदापूर  प्रतिनिधी दत्तात्रय मिसाळ - पुणे जिल्हा परिषदेच्या सदस्या व इस्मा कायदेशीर समितीचे सहअध्यक्षा अंकिता पाटील ठाकरे यांनी केलेल्या सामाजिक कार्याची दखल घेत त्यांना पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर राष्ट्रीय पुरस्कार २०२१ (सामाजिक कार्य) आज महाराष्ट्राचे राज्यपाल माननीय श्री भगत सिंह कोश्यारी जी यांच्या शुभहस्ते राजभवन मुंबई येथे प्रदान करण्यात आला.एक अतिशय दानशूर, कर्तृत्ववान, धर्मपरायण व कार्यक्षम राज्यकर्त्या म्हणून पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे नाव इतिहासात सुवर्णाक्षरांनी लिहिले गेले आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या नावाने दिला जाणारा पुरस्कार आज मला प्राप्त झाला असून या पुरस्काराने अजुन उत्स्फुर्तपणे काम करण्यासाठी प्रेरणा व एक जबाबदारी प्राप्त झाली आहे. असे अंकित पाटील ठाकरे यावेळी म्हणाल्या. प्रमुख अतिथी म्हणून श्रीमंत छत्रपती राजमाता कल्पनाराजे भोसले व विविध क्षेत्रातील मान्यवर या पुरस्कार सोहळ्यासाठी उपस्थित होते.
Image
मुंबई ! डिस्काउंटचे आमिष दाखवून रुग्णांच्या जीवाशी खेळणाऱ्या केमिस्ट वर कारवाईचे शासनाकडे निवेदन. फार्मासिस्ट चे अस्तित्व टिकवण्यासाठी फार्मसी संघटनेचे सरकारकडे साकडे फोटो ओळ - निवेदन स्वीकारताना डॉ राजेंद्र शिंगने अन्न व औषध प्रशासन मंत्री महाराष्ट्र राज्य मुंबई  - सत्यवादी ह्यूमन राइट्स फार्मसी विभाग (महाराष्ट्र) यांचे शिष्टमंडळाने दि. १३-०४-२०२२ रोजी मा. अन्न व औषध प्रशासन मंत्री डॉ. राजेंद्र शिंगने यांची मंत्रालयात भेट घेतली. या भेटीदरम्यान राज्यात मागीलदोन वर्षात काही केमिस्टकडून कशाप्रकारे अवैद्य पद्धतीने १५ते ८० टक्के डिस्काउंटचे फलक दुकानाबाहेर लावून उघडपणे (फार्मसी ऍक्ट १९४८ व फार्मसी प्रैक्टिस रेग्युलेशन ऍक्ट २०१५) कायद्याचे उल्लंघन करून सर्रासपणे निकृष्ट दर्जाची औषधे देऊन रुग्णांची फसवणूक व सामान्य जनमानसात संभ्रम निर्माण होत असल्याची सविस्तर माहिती पुराव्यासहित सादर केली. शिवाय रुग्णांना फार्मासिस्ट कडूनच औषधे मिळणे हे कायद्यानुसार अनिवार्य असुन देखील बरीच ऑनलाइन फार्मसी देखिल औषधे स्विगी/झोमॅटो प्रमाणे फार्मसीचे शिक्षण नसलेल्या कोणाही डिलिव्हरी करणाऱ्या मुलाकडून अनधिकृ...
Image
करंजेत विश्वरत्न महामानव बोधिसत्व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची १३१ वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी. बारामतीतील करंजेगाव मध्ये  अठरापगड जाती असले तरी सर्वच महापुरुषांचे जयंती उत्सव एकत्रित साजरे होत असते. सोमेश्वरनगर - बारामती तालुक्यातील करंजे येथे  विश्वरत्न महामानव बोधिसत्व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची १३१ वी जयंती करंजे ग्रामस्थांसह सोमेश्वर  पंचक्रोशीतील सर्व नागरिकांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. कोरणा च्या पार्श्वभूमीवर गेले दोन वर्ष जयंती साजरी न करता आली त्याअनुषंगाने यावर्षी मोठ्या उत्साहात साजरी करता आली याचे समाधान व्यक्त करत  आज शुक्रवार दि १४ एप्रिल रोजी जयंतीनिमित्त भीमा कोरेगाव येथून ज्योतीचे आगमन करंजेपुल येथे सकाळी नऊ वाजता सोमेश्वर सहकारी कारखान्याचे विद्यमान संचालक म प्रवीण कांबळे,ऋषिकेश गायकवाड, रमाकांत गायकवाड, बाळासाहेब गायकवाड, शिवाजी गायकवाड, सरपंच वैभव गायकवाड, करंजे माजी उपसरपंच बुवासाहेब हुंंबरे ,निहाल गायकवाड, आम आदमी पक्षाचे मुरलीनाना गायकवाड, शिवसेनेचे बंटी गायकवाड,माजी तंटामुक्ती अध्यक्ष संताजी गायकवाड, पत्रकार  संतोष...

समाजातील सर्व घटकांना शिक्षण मिळावे ही शासनाची भूमिका- उच्चशिक्षण मंत्री उदय सामंत

Image
समाजातील सर्व घटकांना शिक्षण मिळावे ही शासनाची भूमिका- उच्चशिक्षण मंत्री उदय सामंत पुणे दि.3: समाजातील सर्व घटकांना शिक्षण मिळाले पाहिजे ही शासनाची भूमिका आहे आणि त्यासाठी आवश्यक प्रयत्न करण्यात येत आहेत, असे प्रतिपादन उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी केले.  महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेच्या वार्षिक दीक्षांत समारंभप्रसंगी ते बोलत होते.  यावेळी एसएनडीटी विद्यापीठाच्या कुलगुरू डॉ. उज्वला चक्रदेव(दूरदृश्य प्रणालीद्वारे)तर कार्यक्रमस्थळी संस्थेचे अध्यक्ष रविंद देव, विद्या कुलकर्णी आदी उपस्थित होते. श्री. सामंत म्हणाले, नवीन शैक्षणिक धोरणात समान संधी मंडळ प्रत्येक ठिकाणी असावे, ही शासनाची भूमिका आहे. समाजातील सर्व घटकांना शिक्षण मिळाले पाहिजे, यासाठी राज्य शासन कटिबद्ध आहे. उच्च शिक्षण सर्वांना उपलब्ध करून देण्यासोबत शैक्षणिक गुणवत्तेकडेही लक्ष देण्यात येत आहे. राज्यातील आदर्श शिक्षण संस्थेत महर्षी कर्वे शिक्षण संस्थेचे नाव अग्रक्रमाने घेतले जाते.संस्थेने केलेले कार्य गौरवास्पद आहे. यापुढेही शैक्षणिक क्षेत्रातील प्रगतीसाठी संस्थेचे योगदान राहील अशी अपेक्षा त्यांनी व्यक...