ह्रदय विकाराच्या झटक्यानं निधन झालेल्या गोरे होमगार्डच्या कुटुंबियांस वडगाव निंबाळकर पोलिस स्टेशनच्या वतीने आर्थिक मदत
ह्रदय विकाराच्या झटक्यानं निधन झालेल्या गोरे होमगार्डच्या कुटुंबियांस वडगाव निंबाळकर पोलिस स्टेशनच्या वतीने आर्थिक मदत
सोमेश्वरनगर :मासाळवाडी (ता. बारामती) येथील होमगार्ड प्रशांत प्रकाश गोरे याचे ह्रदय विकाराच्या झटक्यानं २२ऑगस्ट २०२१ रोजी रक्षाबंधन दिवशी निधन झाले होते. प्रशांत हा वडगाव निंबाळकर पोलिस स्टेशन याठिकाणी होमगार्ड म्हणून काम करीत होता. गोरे यांची आर्थिक परिस्थिती खूप हलाखीची आहे. गोरे यांच्या कुटुंबाला एक आर्धिक मदत म्हणून वडगाव निंबाळकर पोलिस स्टेशनच्या वतीने वडगाव निंबाळकर पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सोमनाथ लांडे यांच्या हस्ते रोख रक्कम ७५ हजार रुपये मदत म्हणून देण्यात आली. यावेळी गोरे यांच्या कुटुंबीयांना अश्रू अनावर झाले.
यावेळी पोलीस उपनिरीक्षक सलीम शेख, पोलिस नाईक बाळासाहेब पानसरे , वैभव कुंभार, भारतीय पत्रकार संघाचे बारामती तालुका अध्यक्ष व दैनिक पुढारीचे पत्रकार काशिनाथ पिंगळे , चांडाळ चौकडीच्या करामती सिरीयलमधील सरपंच सूदाम
Comments
Post a Comment