सोसायटीच्या माध्यमातून शेतकऱ्यांना कर्ज पुरवठा करणार- रमेश लेंडे
सोसायटीच्या माध्यमातून शेतकऱ्यांना कर्ज पुरवठा करणार- रमेश लेंडे जेजुरी दि.१७(प्रतिनिधी) - पुरंदर तालुक्यातील मौजे धालेवाडी येथील क-हा विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीच्या सर्व सभासदांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ देऊन कर्ज पुरवठा करणार असल्याचे नवनिर्वाचित संचालक रमेश लेंडे यांनी सांगितले नुकत्याच पार पडलेल्या सोसायटीच्या निवडणुकीत मौजे धालेवाडी गावचे माजी आदर्श सरपंच संभाजी नाना काळाणे यांच्या मार्गदर्शनाखाली विरोधकांचा १३-० ने पराभव करीत सर्व पॅनेलच विजयी झाला या विजयानंतर तिर्थक्षेत्र आळंदी येथे वाघोली गावचे उद्योजक रोहिदास दादा गोरे व सेवा निवृत्त पोलिस अधिकारी अभिमन्यू उघडे साहेब यांनी रमेश लेंडे यांचा शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला यावेळी सामाजिक कार्यकर्ते महादेव वाघमोडे, सुनील लेंडे,सचिन सातव उपस्थित होते.