श्री क्षेत्र सोमेश्वरमंदिर येथे त्रिपुरी पौर्णिमा संपन्न
- Get link
- X
- Other Apps
श्री क्षेत्र सोमेश्वरमंदिर येथे त्रिपुरी पौर्णिमा संपन्न.
त्रिपुरी पौर्णिमा हा त्रिपुरासुराच्या वधाचा विजयोत्सव!
सोमेश्वरनगर - सर्वत्र मंदिर व परिसरात त्रिपुरी
पौर्णिमेला त्रिपुर प्रकारची वात करून शंकरासमोर दिवा लावला जातो. तसेच घरात, मंदिरात, परिसरात शेकडो दिव्यांनी रोषणाई केली जाते. मंदिरातील दगडी दिपमाळांमध्ये त्रिपुर वात लावून हा उत्सव साजरा केला जातो.
गुरुवारी 18 नोव्हेंबर रोजी कार्तिक पौर्णिमा अर्थात त्रिपुरी पौर्णिमा साजरी केली जाते. या दिवशी भगवान शंकरांनी त्रिपुरासूर नावाच्या राक्षसाचा वध केला , त्या विजयसोहळ्याची ओळख या पौर्णिमेला मिळाली आणि ती त्रिपुरी तसेच त्रिपुरारी पौर्णिमा म्हणून ओळखली जाऊ लागली . या अनुषंगाने जगभरातील मंदिरात आजच्या दिवशी त्रिपुर प्रकारची वात लावत हा दिवस कुटुंबातील सर्व सदस्य एकत्रयेत त्रिपुरीपौर्णिमा दिवस साजरा करतअसतात
बारामती तालुक्यातील प्रसिद्ध श्री क्षेत्र सोमेश्वर मंदिर व मंदिर परिसर तसेच असणाऱ्या दोन भव्य दीपमाळा त्रिपुरी पौर्णिमा निमित्त लावलेल्या दिंव्यांनी आकर्षक दिसत होती तर सोमेश्वरनगर परिसरातील महिलांनी आपले कुटूंब सुखी समृद्धी राहावे अशी प्रार्थना करत त्रिपुर प्रकारची वात श्री सोमेश्वर शिवलिंग गाभारा व परिसरात लावत आनंद व समाधान व्यक्त केले.
- Get link
- X
- Other Apps
Comments
Post a Comment