Posts

Showing posts from July, 2021

" रोटरी क्लब ऑफ वाल्हेकरवाडी" च्या अध्यक्षपदी सचिन खोले.

Image
" रोटरी क्लब ऑफ वाल्हेकरवाडी" च्या अध्यक्षपदी सचिन खोले. बारामती प्रतिनिधी रोटरी वर्ष २०२१-२२ साठीच्या नवनिर्वाचित अध्यक्ष, सचिव व संचालक मंडळ यांचा पद्ग्रहण समारंभ मोठ्या उत्साहात पार पडला.  रोटरी क्लब ऑफ वाल्हेकरवाडी ही संस्था गेली अनेक वर्षे पवना नदी संवर्धन, निसर्ग, पर्यावरण आणि जल संवर्धन या विषयावर काम करत असून अध्यक्ष पदी सचिन खोले आणि सचिव पदी वनिता सावंत यांची निवड करण्यात आली. सदर कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून . पंकज शहा, डिस्ट्रिक गव्हर्नर डिस्ट्रिक्ट ३१३१ तसेच AG बलवीर चावला आणि AGA सत्यजित उंब्रजकर उपस्थित होते. याप्रसंगी अध्यक्ष सचिन खोले यांनी रोटरी क्लब ऑफ वाल्हेकरवाडी येणाऱ्या काळात समाजाच्या उन्नतीसाठी आणि पर्यावरणाच्या रक्षणासाठी अधिक जोमाने कार्य करणार असून पवना नदी स्वच्छता अभियाना सोबतच प्लास्टिक मुक्ती, प्रदूषण मुक्ती, ट्राफिक मुक्ती, हॅपी  व्हिलेज, निराधार आणि वंचितांसाठी मेडिकल प्रोजेक्ट आणि मेंबरशिप डेवलपमेंट अशा विविध उपक्रमावर भर देणार असल्याचे सांगितले. संचालक मंडळात प्रदीप वाल्हेकर, संदीप वाल्हेकर, सचिन काळभोर, सोमनाथ हरपुडे, प्रणाली हरपुडे, स...

बारामती तालुका प्राथमिक शिक्षक सोसायटी अध्यक्षपदी दिपाली साळुंके

Image
बारामती तालुका प्राथमिक शिक्षक सोसायटी अध्यक्षपदी दिपाली साळुंके  सोमेश्वरनगर  प्रतिनिधी बारामती तालुका शिक्षक को- ऑप.क्रेडिट सोसायटीच्या चेअरमनपदी दिपाली मिलन साळुंके तर व्हाईस चेअरमन पदी मच्छिंद्र भोईटे यांची बिनविरोध निवड करण्यात आली.   सोसायटीच्या नुकत्याच झालेल्या मासिक सभेमध्ये संस्थेचे चेअरमन  विशाल रामचंद्र खरात व्हाईस चेअरमन  गणेश चंद्रकांत भगत यांनी राजीनामा दिल्याने संस्थेच्या चेअरमनपदी साळुंके व व्हाईस चेअरमन पदी  भोईटे यांची निवड करण्यात आली.  या सभेत सचिवपदी संतोष कुमार शंकर राऊत यांची फेरनिवड करण्यात आली.संस्थेचे दैनंदिन कामकाज पाहण्याकरता उपसेक्रेटरी पदी  अण्णा नामदास, शफिक इनामदार व. जालिंदर बालगुडे यांची फेरनिवड करण्यात आली. निवडीनंतर बोलताना नवनिर्वाचित चेअरमन साळुंके यांनी आगामी काळात जाहीरनाम्यात दिलेल्या वचन नाम्यानुसार संस्थेचे उत्पन्न वाढवून सभासदांना जास्तीत जास्त पारदर्शक व आदर्श सेवा देण्याचा प्रयत्न करणार असल्याचे सांगितले. तसेच संस्थेच्या वर्षभरातील कामकाजाबद्दल समाधान व आगामी काळातील कामकाजासंदर्भात योग्य त्या सू...

बारामतीतील एकूण पॉझिटिव्ह रुग्ण =43. शहर-10 ग्रामीण-33

Image
बारामतीतील एकूण पॉझिटिव्ह रुग्ण =43.  शहर-10 ग्रामीण-33 सोमेश्वरनगर प्रतिनिधी कालचे शासकीय (07/07/21) एकूण rt-pcr नमुने 261.  एकूण बारामतीमधील पॉझिटिव्ह-22. प्रतीक्षेत -00.  इतर तालुक्यातील पॉझिटिव्ह रुग्ण -07.                      काल तालुक्यामध्ये खाजगी प्रयोगशाळेत तपासणी केलेले एकूण rt-pcr---44 त्यापैकी पॉझिटिव्ह --09-.                   कालचे एकूण एंटीजन -419. त्यापैकी एकूण पॉझिटिव्ह-.12.                 काल दिवसभरातील बारामतीतील एकूण पॉझिटिव्ह रुग्ण   22+09+12 =43.   शहर-10 ग्रामीण-33 .             एकूण रूग्णसंख्या-25839       एकूण बरे झालेले रुग्ण-24948.       एकूण आज डिस्चार्ज--11       मृत्यू-- 665.                          ...

मु.सा.काकडे महाविद्यालयात शासकीय सहकार व लेखा पदविका (G.D.C.& A.) कार्यशाळा संपन्न.

Image
मु.सा.काकडे महाविद्यालयात शासकीय सहकार व लेखा पदविका (G.D.C.& A.)  कार्यशाळा संपन्न. सोमेश्वरनगर प्रतिनिधी  बारामती तालुक्यातील वाघळवाडी-सोमेश्वरनगर येथील  मुगुटराव साहेबराव काकडे महाविद्यालयात वाणिज्य शाखेतील विद्यार्थ्यांसाठी G.D.C.&A (Government Diploma in Co-operation and Accountancy) या विषयावर कार्यशाळा ऑनलाईन आयोजित करण्यात आली. या कार्यशाळेचे उद्घाटन महाविद्यालयाचे सचिव प्रा. जयवंतराव घोरपडे यांनी केले. या प्रसंगी अध्यक्षस्थानी प्राचार्य जवाहर चौधरी होते. उद्घाटन प्रसंगी महाविद्यालयाचे सचिव प्रा. जयवंतराव घोरपडे यांनी G.D.C.&A चे महत्व पटवून दिले. त्यांनी सध्याच्या परिस्थितीमध्ये वाणिज्य शाखेतील विद्यार्थ्यांसाठी या सारख्या शिक्षणाचे महत्त्व अधिक आहे असे सांगितले. तसेच या परिक्षेशिवाय सहकार विभागामध्ये, पतसंस्था, बँका, वित्तीय संस्था या मध्ये काम करण्याची संधी मिळू शकते हे सांगितले.  अध्यक्षीय भाषणात प्राचार्य जवाहर चौधरी यांनी वाणिज्य शाखेतील विद्यार्थ्यांनी केवळ पुस्तकी ज्ञानावर अवलंबून न राहता व्यवसायाभिमुख शिक्षण आणि स्वयंरोजगार या...

प्रसिद्ध श्री सोमेश्वर मंदिर-करंजे परिसरात होणार सुंदर बगीचा..

Image
सोमेश्वर मंदिर परिसरात ऋषी गायकवाड मित्रपरिवार व गायकवाड कुटुंबियांच्या संकल्पनेतून  होणार सुंदर बगीचा.. सोमेश्वरनगर प्रतिनिधी सोमेश्वर देवस्थान हे जागृत देवस्थान म्हणून प्रसिद्ध आहे. या मंदिराचा व परिसराच्या जिर्णोद्धाराचे काम मागील काही वर्षांपासून सुरू आहे. मंदिर परिसरात आता भव्य बगीच्या ची उभारणी केली जाणार आहे.  या मुळे  मंदिराच्या वैभवात आणखीनच भर पडणार आहे.  उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसा निमित्त व सोमेश्वर सहकारी साख़र कारखान्याचे माझी संचालक कै. दत्तात्रय दिनकर गायकवाड यांच्या स्मृती प्रित्यर्थ या बगीच्या ची उभारणी केली जाणार आहे.  या बगीच्या मध्ये सोन चाफा, दुरंतो, गोल्डन सिप्रस इ. सारखी फुलांची व शोभिवंत २६०० रोपे लावली जाणार आहेत. ड्रीप सिस्टम द्वारे या बगीच्या साठी पाण्याची सोय केली जाणार आहे. या रोपांची योग्य ती निगा राखण्याची जबाबदारी सोमेश्वर मंदिर देवस्थान ने घेतली आहे.  बगीच्या मुळे मंदिर परिसर प्रसन्न व हिरवागार होईल. ऋषी गायकवाड मित्रपरिवार व गायकवाड कुटुंबियांच्या संकल्पनेतून या बगीच्या ची उभारणी होत आहे. या बग़ीच्याची उभारनी ...