छत्रपती संभाजी महाराज जयंतीनिमित्त मुर्टीतील युवकांचा रक्ताची तूट भरून काढण्यास हातभार तर १०६ रक्तबॅग केल्या संकलित.



छत्रपती संभाजी महाराज जयंतीनिमित्त मुर्टीतील युवकांचा रक्ताची तूट भरून काढण्यास हातभार तर १०६  रक्तबॅग केल्या संकलित.
सोमेश्वरनगर प्रतिनिधी

सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याचे संचालक  लालासाहेब नलावडे यांनी केलेल्या अवाहना नुसार; छत्रपती छत्रपती संभाजी महाराज जयंतीचे औचित्य साधून, शिवजयंती उत्सव समिती मुर्टी, सह्याद्री प्रतिष्ठान मुर्टी, बारामती विभाग आयोजन केले होते. त्यास पंचक्रोशीतील युवकांचा उस्फूर्त प्रतिसाद मिळाला.
    
      या रक्तदान शिबिराचे उद्घाटन पुणे जिल्हा परिषद बांधकाम व आरोग्य सभापती .प्रमोदका काकडे-देशमुख यांच्या शुभहस्ते करण्यात आले. तसेच कार्यक्रमास संजय गांधी निराधार योजनेचे अध्यक्ष धनवान वदक तसेच मा.युवक अध्यक्ष . विक्रम आप्पा भोसले, मा.सरपंच मोढवे  हनुमंत आप्पा बालगुडे, बारामती दूध संघाचे मा.व्हा.चेअरमन.वैभव मोरे, राष्ट्रवादी सोशल मीडिया अध्यक्ष.सुनिल बनसोडे मा.उपसरपंच बाळासाहेब जगदाळे, चेअरमन .नानासाहेब जगदाळे पाटील.सतिश (बॉस) जगदाळे (उदयोजक), मा.उपसरपंच .लालासो राजपुरे,  मा.उपसरपंच .तानाजी खोमणे, डॉ.ननावरे,  श्री.नानासो गदादे,.निलेश मासाळ उपसरपंच, उपस्थित होते.

संपूर्ण जगात पसरलेल्या कोरोना सारख्या महामारी मुळे, राज्यामध्ये रक्ताचा भीषण तुटवडा निर्माण झाला आहे. 

छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त औचित्य साधून मुर्टी गावातील तरुण युवकांनी एकत्र येऊन रक्तदान शिबिर घेतले त्याबद्दल पुणे जिल्हा परिषदेचे आरोग्य व बांधकाम सभापती   प्रमोद काकडे यांनी युवकांचे कौतुक केले.

 प्रमुख मान्यवरांच्या शुभहस्ते, रक्तदान केलेल्या युवकास प्रमाणपत्र तसेच एक वर्षाकरिता मेडिक्लेम देण्यात आला.

 मुक्ताई ब्लड बँक इंदापूर यांनी रक्तदान शिबिरात सहकार्य केले.

या कार्यक्रमाचे आयोजन शिवजयंती उत्सव समिती मुर्टी, सह्याद्री प्रतिष्ठान बारामती विभाग, तसेच अभिजीत नलावडे, शरद साळुंखे, राहुल चव्हाण, सचिन जगदाळे, निलेश शेलार, स्वप्निल शहा, दिनेश भोसले, निलेश मांढरे, तुषार जगदाळे, श्रीकांत बालगुडे, संजय खोमणे, शिवा गदादे, सनी बालगुडे, रवी शिंदे, दशरथ गदादे, सागर जगदाळे यांनी केले होते.

Comments

Popular posts from this blog

Baramati शरद पवार साहेबांचे नातू योगेंद्र पवार यांनी ऊर्जा भवन येथे उपोषणाला पाठिंबा दर्शवला

जिद्द, चिकाटी , सातत्य आणि ध्येय असले पाहिजे तर यश हे नक्कीच मिळते - पूजा चौगुले

सोमेश्वरनगर ! करंजे तंटामुक्त अध्यक्षपदी सचिन पाटोळे यांची निवड.