बारामती तालुक्यातील पळशी येथे उद्योजक आनंद लोखंडे यांनी विद्यानंद फाउंडेशनच्या माध्यमातून पळशी गावात ५० बेडचे 'कै.शोभाताई लोखंडे' यांच्या नावाने कोविड केअर सेंटर केले उभे.
बारामती तालुक्यातील पळशी येथे उद्योजक आनंद लोखंडे यांनी विद्यानंद फाउंडेशनच्या माध्यमातून पळशी गावात ५० बेडचे 'कै.शोभाताई लोखंडे' यांच्या नावाने कोविड केअर सेंटर केले उभे.
बारामती प्रतिनिधी
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे प्रशासन व आरोग्य सेवेची अक्षरशः तारेवरची कसरत सुरू आहे. बारामती शहर व तालुक्यात दररोज ३०० पेक्षा जास्त रुग्ण आढळत आहेत. वाढत्या रुग्ण संख्येमुळे प्रशासनावर देखील प्रचंड ताण आहे. बारामती शहरामध्ये अनेक सामाजिक संस्थांनी पुढाकार घेत कोविड केअर सेंटर उभे केले. मात्र, ग्रामीण भागात त्यातही जिरायत पट्ट्यामध्ये हे कोविड केअर सेंटर उभे राहिल्याने येथील रुग्णांना दिलासा मिळाला आहे. सध्या सर्वत्र वैद्यकीय आणीबाणी सदृश्य परिस्थिती आहे. अशा काळात अनेक राजकीय पदाधिकारी तसेच उद्योजक वर्ग मदतीपासून अलिप्त आहे. त्यांच्यासमोर लोखंडे यांनी आदर्श घालून दिला आहे.
रुग्णांना केलेली विशेष सोय खालील प्रमाणे
या कोविड सेंटरमध्ये दाखल रुग्णांसाठी विद्यानंद फाउंडेशनच्यावतीने गरम व गार पाणी, वाफेचे मशीन, आवश्यक त्या सर्व गोळ्या, जेवण सेवा आदी आवश्यक सेवा पुरवल्या जात आहेत. या कोविड सेंटरचे नियोजन व कामकाज फाउंडेशनच्या व्यवस्थापकीय संचालिका प्रीती निंबाळकर यांच्या देखरेखी खाली सुरू आहे. पळशी गावचे सरपंच रावसाहेब चौरमले यांची सेंटर उभारणीस मोलाची मदत झाली. प्राथमिक आरोग्य केंद्र पळशीचे पथक येथे रुग्णांना उपचार देत आहे.
Comments
Post a Comment