करंजेपुल दुरक्षेत्र व मुर्टीतील जगताप परिवारातर्फे गरजू कुटूंबाला एक हात मदतीचा.
करंजेपुल दुरक्षेत्र व मुर्टीतील जगताप परिवारातर्फे गरजू कुटूंबाला एक हात मदतीचा.
वडगाव निंबाळकर अंकित करंजेपुल दुरक्षेत्र (ता बारामती) आणि मंगेश व संदेश जगताप मित्र परिवाराच्या वतीने शनिवारी दि २९ रोजी
मुटीँ परिसरातील गरजू लोकांना किराणा साहित्य घरपोच वाटप केले.
लॉकडाऊनच्या काळात हाताला काम नसल्याने गरीब कुटुंबांचे जगणे मुश्कील झाले आहे . अशा परिस्थितीत गरीब कुटुंबांना किराणा कीटचे वाटप करत करंजेपुल दुरक्षेत्र पोलीस व मुर्टीतील ( ता बारामती) उद्योजक जगताप परिवार व कार्यकर्ते एकत्र येत एक हात मदतीचा उपक्रम राबवत आहे. आज गावमधील गरज असलेल्या सर्व माहिती घेत त्या कुटुंबांना या किराणा किटचे वाटप घरपोच करण्यात आले. या वाटपामुळे या लोकांनी करंजी पूल दुर्षेत रे पोलिस कर्मचारी व मंगेश व संदेश जगताप परिवाराचे आभार मानले
त्यांच्या चेहऱ्यावर आनंद दिसल्याने जगताप त्यांचे मन भरून आले. यापुढेही अशीच मदत करणार असून गावातील गरजू लोकांनसाठी अशीच मदत देणार असल्याचे जगताप यांनी बोलताना सांगितले.
यावेळी वडगाव निंबाळकर अंकित करंजेपुल दुरक्षेत्र चे पी एस आय योगेश शेलार, पोलीस हवालदार नितीन बोराडे ,होमगार्ड सोमनाथ पवार ,असिफ शेख, सामजिक कार्यकर्ते भाऊसाहेब हुंबरे ,पत्रकार विनोद गोलांडे , मुर्टी गावचे उद्योजक मंगेश जगताप व संदेश जगताप मित्र परिवार उपस्थित होते.
Comments
Post a Comment