पत्रकार संगीता भापकर यांना जागतिक कृषी पर्यटन २०२१ पुरस्काराचा सन्मान

पत्रकार संगीता भापकर यांना जागतिक कृषी पर्यटन २०२१ पुरस्काराचा सन्मान
सोमेश्वरनगर प्रतिनिधी

दैनिक 'सकाळ'च्या मोरगाव (ता. बारामती) येथील बातमीदार संगीता हनुमंतराव भापकर यांना कृषी पर्यटन विकास संस्था व जागतिक कृषी पर्यटन पुरस्कार निवड समिती यांच्या वतीने दिला जाणारा 'वर्ल्ड अॅग्री टुरिझम अॅवार्ड-२०२१' नुकताच प्राप्त झाला आहे. चौदाव्या जागतिक कृषी पर्यटन दिनानिमित्त 'कृषी पर्यटनाव्दारे महिला शेतकऱ्यांच्या उद्यमशीलतेचा विकास' हे उद्दीष्ट ठरविण्यात आले होते. यानुषंगाने जागतिक कृषी पर्यटन निवड समितीने 'वर्ल्ड अॅग्री टुरिझम अॅवार्ड-२०२१' हा पुरस्कार वेगवेगळ्या देशातील कृषी पर्यटन क्षेत्रात उल्लेखनीय काम  करणाऱ्या अकरा महिलांना जाहिर केला होता. नुकतीच १५ व १६ मे रोजी महाराष्ट्र राज्य कृषी पर्यटन महामंडळ, पर्यटन विकास संस्था यांच्या वतीने दोन दिवस ऑनलाईन आंतरराष्ट्रीय परिषद पार पडली. परिषदेत संगीता भापकर यांना ऑनलाईन पध्दतीने सदरचा पुरस्कार जाहीर करून प्रदान करण्यात आला. याप्रसंगी राज्याचे कृषीमंत्री दादा भुसे, पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे, पर्यटन राज्यमंत्री आदिती तटकरे, राज्याच्या पर्यटन विभागाच्या सचिव वल्सा नायर, राज्य पर्यटन विकास महांडळाचे संचालक आशुतोष सलील, डॉ. धनंजय सावळकर, कृषी पर्यटन विकास संस्थेचे संस्थापक पांडुरंग तावरे आदी उपस्थित होते. आफ्रीका, रवांडा, स्पेन, इडली, फ्रान्स, फिलीपाईन्स अशा विविध देशातील महिलांना यानिमित्त गौरविण्यात आले. भारतातून संगीता भापकर यांच्यासह डॉ. अश्विनी कोळेकर, नंदा कासार, नंदा नरोटे यांना या पुरस्काराने गौरविण्यात आले. 
     
बारामतीतील तरडोली या जिराईत पट्ट्यात निसर्ग संगीत कृषी पर्यटन केंद्र स्थापन करून ग्रामीण व जिराईत भागातील महिलांनासाठी प्रेरणादायक कार्य केले आहे म्हणून भापकर यांना हा पुरस्कार देण्यात आल्याचे पांडुरंग तावरे यांनी सांगितले.कृषी पर्यटन क्षेत्रात उल्लेखनीय काम केल्याबद्दल पुरस्कार....
            
        बारामतीच्या जिरायत भागात प्रतिकूल परिस्थिती शेती आणि शेतीपुरक व्यवसायाला कृषी पर्यटनाची जोड देत ग्रामीण संस्कृतीचे जतन आणि  संवर्धन करण्याचे काम निसर्ग संगीत कृषी पर्यटन केंद्र करत आहे.यामुळे ग्रामीण भागातील स्थानिक महिलांना व्यावसायिक दृष्टीकोनातून रोजगार आणि सक्षमीकरणाच्या संधी कृषी पर्यटनामुळे उपलब्ध झाल्या आहेत. या पुरस्काराबद्द्ल भापकर यांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.

Comments

Popular posts from this blog

Baramati शरद पवार साहेबांचे नातू योगेंद्र पवार यांनी ऊर्जा भवन येथे उपोषणाला पाठिंबा दर्शवला

जिद्द, चिकाटी , सातत्य आणि ध्येय असले पाहिजे तर यश हे नक्कीच मिळते - पूजा चौगुले

सोमेश्वरनगर ! करंजे तंटामुक्त अध्यक्षपदी सचिन पाटोळे यांची निवड.