इंदापूर तालुक्यातील १६ हॉस्पिटलची नोंदणी संशयाच्या भोवऱ्यात; चौकशीचे आदेश.
इंदापूर तालुक्यातील १६ हॉस्पिटलची नोंदणी संशयाच्या भोवऱ्यात; चौकशीचे आदेश. ** जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांकडून तालुका वैद्यकीय अधिकाऱ्यांना सात दिवसांत अहवाल सादर करण्याचे निर्देश; ** शैक्षणिक पात्रता, नोंदणी कागदपत्रांची पडताळणी होणार ——————————————————————— इंदापूर : इंदापूर तालुक्यातील ग्रामीण भागात सुरू असलेल्या १६ रुग्णालयांच्या नोंदणी अथवा नूतनीकरणाच्या प्रक्रियेबाबत तक्रार प्राप्त झाल्यानंतर जिल्हा आरोग्य विभागाने गंभीर दखल घेतली आहे. या सर्व रुग्णालयांची चौकशी करून सविस्तर अहवाल सादर करण्याचे आदेश जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. रामचंद्र हंकारे यांनी तालुका वैद्यकीय अधिकारी, पंचायत समिती इंदापूर यांना दिले आहेत. संबंधित चौकशीचा अहवाल सात दिवसांत सादर करण्याचे निर्देश पत्रातून देण्यात आले आहेत. सुधाकर तुकाराम बोराटे यांनी १३ ऑगस्ट २०२६ रोजी केलेल्या तक्रारीच्या अनुषंगाने जिल्हा आरोग्य विभागाने ही कार्यवाही केली आहे. तक्रारीनुसार...
Comments
Post a Comment