जेजुरीतील संघर्ष युवा प्रतिष्ठान चा स्तुत्य उपक्रम;वृक्षारोपण करून केला वाढदिवस साजरा
जेजुरीतील संघर्ष युवा प्रतिष्ठान चा स्तुत्य उपक्रम;वृक्षारोपण करून केला वाढदिवस साजरा
पुरंदर तालुका प्रतिनिधी सिकंदर नदाफ
अवघ्या महाराष्ट्राचे कुलदैवत असलेल्या खंडेरायाच्या जेजुरी नगरीमध्ये या कोरोनाच्या काळात विविध सामाजिक संस्था आपापल्या परीने काम करत आहेत यातच जेजुरीतील संघर्ष युवा प्रतिष्ठान ने या कोरोनाच्या काळात एक स्तुत्य उपक्रम चालू केला आहे,प्रतिष्ठानचे कार्यकर्ते शुभम विलास राऊत यांच्या 25 व्या वाढदिवसानिमित्त 25 विविध औषधी झाडे लावून त्यांना वाढदिवसाच्या आगळ्या वेगळ्या शुभेच्या देण्यात आल्या यावेळी प्रतिष्ठानचे परितोष राऊत,अक्षय झगडे,अवधूत बारभाई,विराज लांघी,मंगेश झगडे,तुषार आगलावे यांनी वृक्षारोपण केले तर यापुढे संघर्ष युवा प्रतिष्ठान च्या प्रत्येक सदस्याचा असाच वृक्षारोपण करून वाढदिवस साजरा करणार असल्याचे मयुरेश लेंडे यांनी सांगितले
Comments
Post a Comment